आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदींनी प्रियांका आणि निकला दिले तेच गिफ्ट, जे वर्षभरापूर्वी त्यांनी विराट आणि अनुष्काला दिले होते : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे वेडिंग रिसेप्शन झाले.  या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले. त्यांनी स्टेजवर पोहोचून प्रियांका आणि निक यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी दोघांना एक-एक गुलाबाचे फूलदेखील दिले.  


वर्षभरापूर्वी अनुष्का-विराट यांनाही दिले होते हेच गिफ्ट...
- गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे लग्न झाले होते. त्यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थिती लावून मोदींनी दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. खास गोष्ट म्हणजे मोदींनी त्यावेळी दोघांनाही एक-एक गुलाबाचे फुल दिले होते. तेच गिफ्ट त्यांनी प्रियांका आणि निक यांनाही दिले. प्रियांका आणि निकप्रमाणेच विराट आणि अनुष्का यांनीही डेस्टिनेशन वेडिंग केले होते. निकयांकाचे लग्न जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवनमध्ये झाले, तर विरुष्काने इटलीत लग्न थाटले होते. इटलीहून परतल्यानंतर विरुष्काने दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन दिले होते. प्रियांकाचाही हाच प्लान असून तिचे एक रिसेप्शन दिल्लीत झाले. पुढील आठवड्यात दुसरे रिसेप्शन मुंबईत होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...