आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 August:मोदींनी पाचव्यांदा लाल किल्ल्यावर फडकावला तिरंगा, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांची बरोबरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुधवारी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पाचव्यांदा तिरंगा फडकावला. लाल किल्ल्यावर सर्वाधिकवेळा तिरंगा फडकावणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत मोदी आता सहाव्या क्रमांकावर आले आहेत. पहिल्या क्रमांकावर आहेत, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत. त्यांनी 17 वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. दुसऱ्या क्रमांकावर आहेत इंदिरा गांधी. त्यांना सोळा वेळा ही संधी मिळाली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 वेळा तिरंगा फडकावला. काँग्रेसशिवाय इतर पक्षाच्या पंतप्रधानांमध्ये अटल बिहारी वाजपेयी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सहा वेळा ध्वजारोहण केले आहे. इतर पक्षांमधील पंतप्रधानांमध्ये वाजपेयींनंतर मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 


गुलजारीलाल नंदा आणि चंद्रशेखर यांना संधी नाही 
गुलजारीलाल नंदा आणि चंद्रशेखर यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची संधीच मिळाली नाही. नंदा दोन वेळा 13-13 दिवसांसाठी पंतप्रधान बनले. सर्वात आधी 27 मे ते 9 जून 1964 आणि दुसऱ्यांदा 11 जानेवारी ते 24 जानेवारी 1966 पर्यंत ते प्रभारी पंतप्रधान राहिले. तर चंद्रशेखर 10 नोव्हेंबर 1990 पासून 21 जून 1991 पर्यंत पंतप्रधान राहिले. 

 

क्र. नाव कार्यकाळ किती वेळा फडकावला तिरंगा
1. जवाहरलाल नेहरू ऑगस्ट 1947 ते मे 1964 17 वेळा : 1947-1963
2. इंदिरा गांधी

जानेवारी 1966-मार्च 1977 आणि जानेवारी 1980-ऑक्टोबर 1984

16 वेळा : 1966-1976
3. मनमोहन सिंग मे 2004-मे 2014 10 वेळा: 2004-2013
4. अटल बिहारी वाजपेयी

मे 1996 ते जून 1996 आणि मार्च 1998 ते मे 2004

6 वेळा: 1998-2003
5. राजीव गांधी ऑक्टोबर 1984-डिसेंबर 1989 5 वेळा: 1985-1989
6.

पीव्ही

नरसिंहराव

जून 1991-मे 1996 5 वेळा: 1991-1995
7. नरेंद्र मोदी मे 2014-आतापर्यंत  5 वेळा: 2014-2018

मोदी हे लाल किल्ल्यावरून सर्वात मोठे भाषण करणारे पंतप्रधान 

वर्ष  वेळ
2014 65 मिनिटे
2015 86 मिनिटे
2016 96 मिनिटे
2017  56 मिनिटे
2018 82 मिनिटे


मोदींनी मोडला होता नेहरूंचा विक्रम 
देशाचे पहिले पंतप्रधान असलेल्या जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून 1947 मध्ये 72 मिनिटांचे भाषण केले होते. 2015 पर्यंत ते सर्वात मोठे भाषण होते. मोदींनी त्यांचा हा विक्रम मोडला. मनमोहन सिंह यांनी लाल किल्ल्यावरून 10 वेळा देशाला संबोधित केले. फक्त दोन वेळा त्यांचे भाषण 50 मिनिटांचे राहिले. इतर आठ वेळा त्यांनी 32 ते 45 मिनिटे या दरम्यानच भाषण केले. तर अटल बिहारी वाजपेयी स्वातंत्र्य दिनी 30 ते 35 मिनिटे भाषण करायेच. 

बातम्या आणखी आहेत...