आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(सोमवार) दिल्लीतील कडकड़डूमामधील सीबीडी ग्राउंडमध्ये झालेल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की- ही निवडणूक या दशकातील पहिली निवडणूक असेल, जी 21व्या शतकात भारत आणि भारताच्या राजधानीचे भविष्य ठरवण्यास मदत करेल. 8 फेब्रुवारीला पडणारे मतदान फक्त सरकार बनवण्यासाठीच नाही, तर या दशकात दिल्लीच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्यासाठी असेल. 21 व्या शतकाती भारत द्वेशाच्या राजकारणामुळे नाही तर विकासाच्या राष्ट्रनीतीने चालेल. विकासाची ही राष्ट्रनीती देशाला गती देईल आणि नव्या उंचीवर नेऊन ठेवेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या(मंगळवार) द्वारकेत दुसऱ्या रॅलीला संबोधित करतील. यावेळेस दिल्लीमध्ये मोदींच्या फक्त दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या 70 विधानसबा जागेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होईल तर 11 फेब्रुवारीला निकाल लागेल.
मतदानामुळे देशाला बदलण्यास मदत मिळाली- मोदी
"दिल्लीच्या नागरिकांनी देशाला बदलण्यास मदत केली आहे. आता दिल्लीच्या नागरिकांचे मत दिल्लीला बदलण्यासही मदत करेल. दिल्लीकरांचे मतदान आयुष्य बदलण्यास मदत करेल. दिल्ली फक्त एक शहर नसून आपल्या देशाची संपत्ती आहे. हे भारताच्या अनेक रंगांना एकत्रित करण्याच ठिकाण आहे. दिल्ली सर्वांचा सत्कार आणि सर्वांचाच स्विकार करते."
"दिल्ली निवडणूक घोषणेनंतर माझी पहिलीच सभा आहे. दिल्लीकरांच्या मनात काय आहे, हे सांगण्याची गर नाही. लोकसभा निवडणुकीत दिल्लीकरांच्या मतदानामुळे भाजपची ताकद वाढली. दिल्लीतील साहती जागा जिंकवून दिल्लीकरांनी आपली पसंत दाखवून दिली आहे. प्रत्येक भारतीयाला दिल्लीने जागा दिली. दिल्लीच्या विकासात प्रत्येक दिल्लीकरांच्या घामाचा वास येतो. ही निवडणूक दिल्लीला एक नवीन गौरव मिळवून देण्याचा संकल्प आहे."
कार्यक्रमस्थळी अमित शाहंचे फोटो नाही
कडकड़डूमाच्या रॅलीमध्ये मंचावर मोदींसोबत दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचेच फोटो दिसले. कार्यक्रमस्थळी अमित शाह यांचे फोटो नव्हते. राजकीय जगतात अशी चर्चा आहे की, जर दिल्लीत आपेक्षित यश आले नाही. तर अपयशाचे टोपले जेपी नड्डा यांच्यावर फोडण्यात येतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.