आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'फिट इंडिया' मोहिमेचा शुभारंभ; दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडला कार्यक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या पार्श्वभूमीवर 'फिट इंडिया' अभियानाची सुरुवात केली. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजच्या दिवशी आपल्याला मेजर ध्यानचंद यांच्या रुपाने हॉकीचा जादूगर मिळाला होता. फिट इंडिया अभियान एक महत्वपूर्ण पाऊल आहे. मी क्रीडा मंत्रालय आणि युवा विभागाला शुभेच्छा देतो. बॉडी फिट तर माइंड हिट. फिटनेससाठीची गुंतवणूक ही शून्य आहे पण यामध्ये 100% रिटर्न मिळतो.  तंदुरुस्त राहण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा त्यामागचा हेतू आहे. या अभियानात उद्योग, चित्रपटसृष्टी, खेळ विश्वासह इतर क्षेत्रातली अनेकांचा सहभाग आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतेच 'मन की बात' कार्यक्रमात या अभियानाचा उल्लेख केला होता. 

क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, या अभियानाच्या पहिल्या वर्षात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर भर देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षी पौष्टिक अन्न आणि खाण्याच्या सवयीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या वर्षी टिकाऊ आणि पर्यावरण पुरक जीवनशैली स्वीकारण्यावर भर देण्यात येईल. चौथ्या वर्षी निरोगी जीवनशैलीच्या सवयी, आरोग्यासाठी अनुकूल गोष्टींना सवयीमध्ये समाविष्ट करण्यात लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. फिट इंडिया अभियानासाठी वेगळे सचिवालय तयार करण्याचा प्रस्ताव आहे. 
 

तंदुरुस्त राहिल्याने सर्व गोष्टी परिपूर्ण होतात 
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, फिटनेस एक जन आंदोलन व्हायला हवे. बॅडमिंटन, कुस्तीसह सर्व खेळांमध्ये आपले खेळाडू अपेक्षांना नवीन पंख देत आहेत. हा नवीन भारताच्या आत्मविश्वाचा एक उपाय आहे. खेळासाठी अधिक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. 
 
फिटनेस हा एक शब्द नाही तर निरोगी आणि समृद्ध जीवनाची एक आवश्यकता आहे. आपल्या संस्कृतीत फिटनेसवर भर देण्यात आला आहे. आपल्या आयुष्याचा एक हिस्सा राहिला आहे. व्यायामाने स्वास्थ्य, दीर्घआयुष्य आणि सुख मिळत असल्याचे आपल्या पुर्वजांनी सांगितले होते. निरोगी राहिल्याने सर्व गोष्टी परिपूर्ण होतात पण आता स्वार्थाने सर्व कार्य पूर्ण होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. म्हणूनच स्वार्थाच्या निरोगी भावनेसाठी काम करणे आवश्यक आहे.
 

पहिल्या महिन्यात वॉकथान, सायकल आणि तपासणी शिबीराने होईल सुरुवात
प्रस्तावानुसार, अभियानाच्या पहिल्या महिन्यात देशातील सर्व शिक्षण संस्थानांमध्ये क्रीडा प्रतिभेसह वॉकथान सायकल रॅली आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच तपासणी शिबीर उभारण्यात येईल. दुसऱ्या महिन्यात गाव आणि जिल्ह्यातील शाळा आणि विद्यापीठ स्तरावर खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होणे गरजेचे असेल. तिसऱ्या महिन्यात सोशल मीडियाद्वारे फिटनेस क्लब तयार करण्यासाठी प्रेरित करण्यात येईल. जेणेकरून दर आठवड्याला परिवार आणि मित्रांना या अभियानात सहभागी करता येईल. चौथ्या महिन्यात क्रीडा मैदाने तयार करण्यात येतील. 

बातम्या आणखी आहेत...