आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आज गुजरात दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांची सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातच्या एकदिवसीय दौऱ्यावर जातील. त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. त्याशिवाय शेतकरी मेळाव्यालादेखील ते संबोधित करतील.

 
रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात ते आणंद, कच्छ व राजकोटला जातील. आणंदमधील मोगर येथील सुमारे १९० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या १००० टन उत्पादन क्षमतेच्या एका चॉकलेट संयंत्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. कोलकातामध्ये एका डेअरी प्रकल्पाचा ऑनलाइन शिलान्यासही केला जाणार आहे. आैषधी खाद्यपदार्थाच्या योजनेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्याशिवाय ३७५ कोटी रुपये खर्चून सुमारे ६७ किलोमीटर लांबीच्या गॅस पाइपलाइनचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.  


राजकोटला जाहीर सभा : मोदी राजकोटलाही भेट देतील. राजकोटला होणाऱ्या एका जाहीर सभेत ते मार्गदर्शन करतील. मनपाकडून २६ कोटींच्या गांधी संग्रहालयाचे नूतनीकरण आणि लोकार्पण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...