आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींनी गांधी आणि शास्त्रींना वाहिली श्रद्धांजली; स्वच्छता अभियानासंदर्भात करणार विशेष घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी विजयघाटावर माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्रींना नमन केले. मोदींसह भाजपा नेता लालकृष्ण आडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान पंतप्रधान मोदी गांधी जयंतीच्या अनुषंगाने दिल्ली आणि गुजरातमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 
 

अहमदाबादेतील कार्यक्रमात संबोधित करणार मोदी
मोदी बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त अहमदाबादेतील साबरमती रिव्हरफ्रंट येथे 20 हजार पेक्षा जास्त सरपंचांच्या महासंमेलनाला संबोधित करणार आहेत. यावेळी संपूर्ण देशाला उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त केल्याचे घोषित करणार आहेत. यानंतर ते सायंकाळी सहा वाजता अहमदाबाद येथे जाणार आहेत. तेथे जवळपास वीस मिनिटे साबरमती गांधी आश्रमात वेळ घालवणार आहे. तर रात्री साडेआठ वाजता जीएमडीसी मैदानावर आयोजित नवरात्री महोत्सवात सहभाग घेणार आहेत. यानंतर ते रात्रीच दिल्लीला रवाना होतील. 

बातम्या आणखी आहेत...