पाकिस्तानात हवाई हल्ल्यानंतर / पाकिस्तानात हवाई हल्ल्यानंतर राजस्थानमध्ये मोदींची जाहीर सभा; पंतप्रधान म्हणाले, देश सुरक्षित हातात

दिव्य मराठी वेब टीम

Feb 26,2019 02:31:00 PM IST

चुरू - पाकिस्तानात घुसून भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांवर कारवाई केली त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या चुरू येथे सार्वजनिक सभेला संबोधित केले. तसेच हवाई दल आणि भारतीय जवानांचे मनापासून अभिनंदन केले. पीएम मोदी जवानांचे कौतुक करत होते, त्याचवेळी त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वाक्यांचा पुनरुच्चार केला. तसेच 'मै देश नही झुकने दूंगा' ही कविता सादर करून देश सुरक्षित हातात आहे असा दावा केला. या संपूर्ण भाषणादरम्यान सभेतून मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या जात होत्या.

सरकारच्या कामांचा पाढा, विरोधकांवर टीका
पंतप्रधानांनी चुरू येथील सभेला संबोधित करताना आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा देखील वाचला. यात आपल्या सरकारने जवानांना दिलेल्या वन रँक वन पेन्शनचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्णही केले. राजस्थानच्या 1 लाख जवानांना याचा फायदा होणार असेही मोदी म्हणाले. मोदींनी केंद्र सरकारचे यश मोजून दाखवताना स्वतःला प्रधानसेवक असे संबोधले. राजस्थानच्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजना अद्याप मिळाल्या नाहीत, यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार जबाबदार आहे. कारण, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याने आम्हाला शेतकऱ्यांची यादीच दिली नाही असा आरोप मोदींनी केला.

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील 7.5 लाख कोटी रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे, येत्या 10 वर्षांत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 7.5 लाख कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काहीही करण्याची गरज नाही. त्यांना फक्त मोबाईलवर एक नोटीफिकेशन येईल, की तुमच्या खात्यात ठराविक रक्कम जमा झाली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांची यादी सरकारकडे उपलब्ध आहे.

X
COMMENT