आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही दिल्लीत जसे नरेंद्रला बसवले, तसे राज्यात देवेंद्रला बसवा, खारघरमधील प्रचार सभेत पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात प्रचारसभा घेत आहेत. त्यांची आज नवी मुंबईतील खारघरमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित जनतेला भाजप-शिवसेना युतीला परत निवडूण देण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "जसे तुम्ही दिल्लीत नरेंद्रला निवडून दिले, तसे महाराष्ट्रात देवेंद्रला निवडूण द्या. ही नरेंद्र-देवेंद्रची जोडी मागील पाच वर्षात हीट ठरली आहे." ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेण या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यात गरिबांना स्वःचे हक्काचे घर देण्याचा आमचा संकल्प असल्याचे मोदी म्हणाले. तसेच, मासे माऱ्यांसाठी नव्या योजना आखत आहोत. त्यातच मासेमाऱ्यांचे पैसे थेट बँकेत जमा व्हावेत. तसेच त्यांच्या बोटी आधुनिक करण्यासाठी योजना सुरू असल्याचेही देखील मोदींनी सांगितले.
ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेण या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आलं. मोदींच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.या सभेला नवी मुंबई आणि रायगड येथील महायुतीचे उमेदवार, कार्यकर्ते आणि उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यामुळे या मैदानात भव्य व्यासपीठासह मोठा सभामंडप उभारण्यात आला होता.

 

बातम्या आणखी आहेत...