आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर जलमधून राज्य पाणीदार करणार : मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिनेश लिंबेकर, रवी उबाळे

बीड - कलम ३७० हटवण्यास विरोध म्हणजे देशहिताला विरोध, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूकीत भाजपच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी परळीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. येणाऱ्या पाच वर्षांत ‘हर घर जल या याेजनेतून’देशभरातील घराघरात पिण्याचे पाणी पाेहचणार आहे, त्याचा लाभ महाराष्ट्रालाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या विजयी संकल्प सभेत पंतप्रधान माेदी यांनी उपस्थितांची परवानगी घेत, तुम्ही माझ्या प्रश्नांना उत्तरे देताल का, अशी विचारणा केली. तेंव्हा जनसमुदायाने हाेकार दिला. मग राजकारणात थकलेले लाेक तुमचे चांगले करतील का आिण तुम्हाला आज अशा लाेकाची गरज आहे का, असा पहिला प्रश्न माेदींनी विचारताच जनसमुदायाने नाही असे उत्तर दिले. तेव्हा माेदी म्हणाले, जाे विचार आज बीड करत आहे, ताेच विचार महाराष्ट्र करत आहे. मागील पाच वर्षांची कार्यशक्ती भाजपच्या बाजूने आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये स्वार्थशक्ती आली आहे. लाेक कार्यशक्तीची पूजा करतात आणि स्वार्थशक्तीचा नेहमी तिरस्कार करतात, असे माेदी यांनी सांगितले. कलम ३७० हटण्यात आले यावरून देशातील लाेकशाही संपली आहे का? असा प्रश्न माेदींनी िवचारला तेव्हा जनसमुदायाने नाही हेच उत्तर दिले. मी आज बीडमधून हिंदुस्थानला लक्षात आणून देताे की कलम ३७० ला विराेध करणाऱ्यांची नोंद इतिहासामध्ये हाेईल. ३७० कलम लागू करण्यात आल्यानंतर आज तीन महिने लाेटले देशाचे काय नुकसान झाले? तेव्हा उपस्थितांनी नुकसान झाले नाही, असे उत्तर दिले. ३७० कलम हटवण्यास विराेध त्यांना शाेभा देत नाही. देशहिताच्या विराेधात आराेप करणाऱ्यांंच्या विराेधात २१ आॅक्टाेबरपर्यंत आम्ही बाेलणारच आहाेत, असे ते म्हणाले.
 

मुंडे व महाजन हे मित्र मला तुम्हीच दिले, पंकजा मुंडे निष्ठेने काम करताहेत 
बाबा वैद्यनाथाचा आशीर्वाद बीडला आहे आणि बीड जिल्ह्याचा आशीर्वाद भाजपला राहिला. गाेपीनाथ मुंडे आणि प्रमाेद महाजन असे सच्चे मित्र तुम्ही मला दिले. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हजाराे, लाखाे महत्त्वाकांक्षी लाेकांना ते आशीर्वाद देत असतील. पंकजा मुंडे आज निष्ठा आणि इमानदारीने काम करत आहे यातून आपण अनेक वेळा बीड जिल्ह्यात कमळ फुलवलेले आहे. हा जनसागर पूर्वीचे सर्व रेकाॅर्ड माेडेल हे पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा श्वास कमी हाेत आहे. या दाेन्ही पक्षांतून तरुण आणि ज्येष्ठ नेते साेडचिठ्ठी देऊन निघून जात आहेत. त्याचे आत्मपरीक्षण या पक्षाने करण्याची गरज आहे.

भाषणाची सुरुवात मराठीतून... 

माझे मित्र गाेपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत मी आज आलाे…

परळी येथे पतंप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली. यात भारत माता की जय, जय शिव शंभाे असे म्हणत त्यांनी उपस्थितांकडून टाळ्या घेतल्या. बाबा वैद्यनाथाच्या पावन भूमीत आणि माझे मित्र गाेपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत मी आज आलाे आहे. संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील सर्वांना माझा नमस्कार. आज मला परळीत एकाच वेळी दाेन देवांचे दर्शन घेता आले. त्यामध्ये एक बाबा वैद्यनाथ, तर दुसरे जनता जनर्दनाचे दर्शन झाले. येथे येऊन बाबा वैद्यनाथाचे दर्शन न घेता काेणीही जाणार नाही. साेमनाथाच्या भूमीत जन्मलाे, आज वैद्यनाथच्या दर्शनाला आलाे. देशभरात मला सेवा करण्याचा याेग येत असल्याचे माेदी यांनी आवर्जून सांगितले.

सुटी नको, मतदान करा
येत्या २१ ऑक्टाेबरला साेमवार आहे. त्याआधी रविवार येत आहे. दाेन सुट्या येत असल्या तरी मतदारांनी सुटी घेऊ नये, हा लाेकशाहीचा उत्सव आहे. ताे मतदान करून साजरा करावा. यंदा आपण बीड जिल्ह्यातून निर्णय करावा पुरुषांपेक्षा महिलाच जास्तीत जास्त मतदान करतील, त्यासाठी घराेघरी जावे लागेल. महिलांचे मतदान जास्त झाले पािहजे. आपले आशीर्वाद मिळेलच, महिलांचाही आशीर्वाद मिळाला पािहजे. पुन्हा आणूया आपले सरकार, अशी मराठीतून साद घालत माेदींनी भाषणाच्या शेवटी ‘भारत माता की जय’च्या घाेषणा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...