आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीत परतले, पदाधिकाऱ्यांनी पालम विमानतळावर केले स्वागत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आठवडाभराच्या अमेरिकेचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री भारतात परतले. यावेळी भाजपने त्यांच्या स्वागतासाठी दिल्लीतील पालम विमानतळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे पी नड्डासह अनेक नेतेमंडळींची विमानतळावर उपस्थिती होती. 
 
विमानतळाबाहेर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, 'तुम्ही मोठ्या संख्येने विमानतळावर आलात. माझे स्वागत केले. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या सर्वांद्वारे मी संपूर्ण भारतभरातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना प्रणाम करतो. तसेच 130 कोटी देशवासीयांचे अभिनंदन करतो. 
 

   

मोदींनी देशवासियांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा 
मोदी पुढे बोलतांना म्हणाले की, उद्यापासून नवरात्रीचे पर्व सुरु होत आहे. देशभरात शक्तीच्या उपासनेचे पर्व तसेच दुर्गा पूजा महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. या पवित्र उत्सवाबद्दल मी सर्व देशवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. 
 
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत हाउडी मोदी कार्यक्रमाला संबोधित केले. याव्यतिरिक्त, त्यांनी अनेक देशांच्या प्रमुखांशी भेट घेतली आणि बर्‍याच व्यावसायिक बैठकांमध्ये भाग घेतला. अमेरिकेच्या सात दिवसीय दौऱ्यानंतर शनिवारी ते भारतात परतले. 

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधान मोदींच्या आगमनानिमित्त दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. यासाठी निमलष्करी दलाच्या 9 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. डीसीपी (मध्य दिल्ली) एम एस रंधावा म्हणाले की काही संवेदनशील ठिकाणी इमारतींच्या छतावर स्नायपर तैनात केले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...