आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नमामि गंगे' प्रकल्पाचा मोदींकडून आढावा, अटल घाटावर केली पाहणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदींनी शनिवारी राष्ट्रीय गंगा परिषदेच्या पहिल्या बैठकीला हजेरी लावली. त्यात नमामि गंगे प्रकल्पात आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेतला. माेदींच्या अध्यक्षतेखाली चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठात ही बैठक घेण्यात आली. अटल घाटावर त्यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली.

गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या कामांचे परीक्षण त्यांनी केले. या बैठकीला उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंडच्या मंत्र्यांची उपस्थिती हाेती. मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ व त्यांचे समकक्ष त्रिवेंद्र सिंग रावत हे या बैठकीत सहभागी झाले हाेते. त्याशिवाय मंत्री प्रकाश जावडेकर, गजेंद्र सिंह शेखावत, डाॅ. हर्षवर्धन, आर. के. सिंह, प्रल्हाद पटेल, मनसुख मंदावी, हरदीप सिंग पुरी यांनीही बैठकीला हजेरी लावली हाेती.

नमामि गंगे प्रकल्प सुरू करण्यात आल्यानंतर कानपूरमधील १६ पैकी १३ गटारांची सर्वात आधी स्वच्छता करण्यात आली. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ती प्रक्रिया प्रकल्पांकडे वळवण्यात आली हाेते. सुरक्षा व्यवस्था कडक : माेदींच्या दाैऱ्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली हाेती. विशेष सुरक्षा दलाकडून परिसरातील ४६ गावे, वसाहतींवर निगराणी ठेवण्यात आली हाेती. त्याशिवाय अटल घाट भागात १५ जीवन रक्षक नाैकाही तैनात ठेवण्यात आल्या हाेत्या.