आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी बॉलिवूडकरांना म्हणाले - 'गांधी आणि गांधीवादावर चित्रपट बनवा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त चित्रपट-कला क्षेत्रातील बडे कलाकार शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले. आमिर खान, शाहरुख खान, कंगना रनौट, सोनम कपूर आणि एकता कपूरसह चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी गांधीजींशी संबंधित कार्यक्रमावर चर्चा केली. या वेळी मोदी म्हणाले, 'गांधीजींचे विचार साधेपणाचे पर्याय आणि व्यापक आहेत.' रचनात्मकतेला प्रोत्साहन देण्याची गरज प्रतिपादित करून मोदींनी गुजरातमधील दांडी संग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्याचा सल्ला दिला. यादरम्यान मोदी हेदेखील म्हणाले की, चित्रपट सृष्टीतील लोकांनी गांधी आणि गांधीवादावर चित्रपट बनवला पाहिजे.'  

शाहरुख-आमिरने मोदींचे मानले आभार... 
यावर आमिर खान म्हणाला, 'बापूंच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मोदींनी चालवलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. या दिशेने कार्य करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास मी व्यक्त करतो.' तसेच शाहरुख खाननेही मनोरंजन जगतातील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांचे आभार मानले. तो म्हणाला, "मला जाणवते आहे की, आज भारत आणि जगामध्ये महात्मा गांधीजींचा परिचय नव्याने करून देण्याची गरज आहे."

अनेक कलाकार झाले सामील... 
कार्यक्रमामध्ये निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी, कंगना रनौत, जॅकलिन फर्नांडीज, इम्तियाज अली, एकता कपूर, अनुराग बसु, बोनी कपूर, जॅकी श्रॉफ आणि सनी देओल हेदेखील सामील झाले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...