आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान मोदी, शहा खोटारड्यांचे सरदार : खरगे

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याच्या खोट्या घोषणा करणारे, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केली.

काँग्रेसच्या १३५ व्या स्थापना दिनानिमित्त जिथे काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्या ऐतिहासिक गोकुळदास तेजपाल हॉल येथे मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानातील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन करून लोकशाही व संविधानविरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात 'भारत बचाओ - संविधान बचाओ' फ्लॅग मार्च काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी झाले होते. या वेळी एकनाथ गायकवाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. या वेळी सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे, मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ.डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.