आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींच्या विकासासाठी जिल्हा दत्तक घेणार आहेत पीएम मोदी, अमित शहांचे आश्वासन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर - राज्यातील नंदुरबार आदिवासी जिल्हा आदिवासींच्या विकासाच्या दुष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी दत्तक घेणार आहे. असे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते नवापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचार सभेत आले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या राष्ट्रीय योजनांसह कलम 370 चा आवर्जून उल्लेख केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवापूर येथे जाहीर सभा घेण्यात आली. 370 कलम याशिवाय देशातील मागास आदिवासी जिल्ह्यांच्या विकासासाठी पंतप्रधान कार्यालयाने थेट कार्यक्रम हाती घेतला. तसेच पंतप्रधानांनी या आदिवासी जिल्ह्यांना विकासासाठी दत्तक घेतले आहे अशी माहिती अमित शहा यांनी दिली. 75 वर्षांत काँग्रेसने आदिवासींना विकासाच्या आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही. असे बोलताना शहांनी सर्व राष्ट्रीय मुद्यांचा उल्लेख केला. या सभेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.