आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदी आणि बिअर ग्रिल्ससोबत Man vs Wild; मोदींचा Adventure लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच रियालिटी शो Man vs Wild मध्ये चक्क बिअर ग्रिल्ससोबत दिसणार आहेत. बिअर ग्रिल्सने हा व्हिडिओ आपल्या फेसबूक आणि ट्विटर पेजवर शेअर करून यासंदर्भातील घोषणा केली. प्रोमो शेअर करताना हा कार्यक्रम कधी लागणार याची माहिती सुद्धा त्याने दिली आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनलवर प्रेक्षकांना मोदी आणि ग्रिल्स यांचा अॅडव्हेंचर पाहायला मिळणार आहे. केवळ भारतातच नव्हे, तर 180 देशांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.