आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुलगा कुणाचाही असो अशा स्वरुपाचे वर्तन असह्य!' बॅटधारी भाजप आमदारावर बरसले पीएम मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मनपा अधिकाऱ्यांना क्रिकेट बॅटने मारहाण करून चर्चेत आलेल्या भाजप आमदारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. आकाश विजयवर्गीयचे नाव न घेता मोदींनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. "मला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही, की या घटनेमागे कुणाच्या मुलाचा हात आहे. अशा स्वरुपाचे वर्तन कदापी सहन करता येणार नाही. ज्या लोकांनी त्याला यासाठी प्रोत्साहित केले, त्यांना देखील पक्षातून काढायला हवे." आकाश विजयवर्गीय भाजपचे वादग्रस्त नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत. गेल्या आठवड्यात मारहाण प्रकरणी आकाश यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीच जामीनावर सोडण्यात आले आहे.


इंदूर येथून भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी ऑन कॅमेरा मनपा अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली होती. त्याच प्रकरणात 26 जून रोजी त्यांना अटक करण्यात आली. यानंतर सोमवारी जामीनावर सुटका देखील झाली. जामीन मिळताच आकाश यांच्या समर्थकांनी त्यांचे हार घालून विजेत्यासारखे स्वागत केले होते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोषात हवेत गोळीबार देखील करण्यात आला. कैलास विजयवर्गीय यांच्या मुलाने तुरुंगातून सुटताच मीडियाशी संवाद साधला होता. तसेच आपण प्रार्थना करतो की पुन्हा बॅट हातात घेण्याची वेळ येऊ नये असे विधान केले होते. एवढेच नव्हे, तर मी जे काही केले त्याचा काहीच पश्चाताप नसल्याचे ते म्हणाले होते.