आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींचा 12 दिवसांत दुसरा महाराष्ट्र दौरा; आज नाशकात सभेला संबोधित करणार, विविध घोषणा करण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमधून आपल्या महाजनादेश यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा नाशिक येथे गुरुवारी समारोप होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती राहणार असून ते सभेला संबोधित करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मोदी काही घोषणा करू शकतात. दरम्यान पंतप्रधान मोदींचा 12 दिवसांत हा दुसरा महाराष्ट्र दौरा होणार आहे. ते यापूर्वी 7 सप्टेंबर रोजी मुंबई आणि औरंगाबाद येथे आले होते.  

तपोवन भागात ही सभा होणार आहे. याअगोदर नाशिकमध्ये बुधवारी एक बाईक रॅली काढण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नाशकातील तिन्ही विधानसभा जागांवर भाजपचे वर्चस्व आहे. 

युती निश्चित, पण जागावाटपांवरून तणाव 
राज्यात भाजप-शिवसेनेची युती निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षात जागावाटपांबाबत भाडणाची स्थिती दिसून येत आहे. दरम्यान भाजप-शिवसेना 50-50% जागांवर लढणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र शिवसेनेच्या जागा कमी कराव्यात असे पक्षाच्या नेत्यांना वाटते, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.