आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहता येत नसताना मित्राचा जीव वाचविण्यासाठी घेतली तलावात उडी, या शौर्याबद्दल प्रजासत्ताकदिनी करण्यात येणार सन्मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रायपूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जानेवारी 2019 रोजी छत्तीसगडच्या तीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. धमतरी जिल्ह्यातील भुरसीडोंगरी गावातील श्रीकांत गंजीर, रायपूर येथील रितिक साहू आणि झगेंद्र साहू या तिघांना त्यांच्या शौर्यासाठी शौर्य पदक, प्रमामपत्र आणि 20 हजार रूपये रोख बक्षीस रूपात देण्यात येणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या शौर्याविषयी

 

पहिली घटना; श्रीकांतने अशाप्रकारे वाचविला 9 वर्षीय मुलाचा जीव

- ही घटना 23 डिसेंबर 2017 रोजीची आहे. 9 वर्षीय आशीण नेताम एका मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गावातील तलावात गेला होता. दरम्यान नकळतपणे तो खोलवर पाण्यात गेला. दरम्यान तलावाजळून सायकलवर जाणाऱ्या श्रीकांतची त्याच्यावर नजर पडली. 

- श्रीकांतने तत्काळ सायकल सोडत तलावात उडी घेतली आणि आशीषे प्राण वाचवले. तेव्हा आशीण चौथी आणि श्रीकांत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होते. 

- श्रीकांतने सांगितले की, त्याला पोहता येत नव्हते पण मित्राला डुबताना पाहून मी स्वतःला रोखू शकलो नाही. मुलाने दाखविलेल्या साहसाबद्दल मला गर्व असल्याचे श्रीकांतचे पिता बिटेश्वर गंजीर यांनी सांगितले. 

 

दुसरी घटना ; पोहता येत नसताना मित्राला वाजविण्यासाठी घेतली उडी

- ही घटना 29 जुलै 2017 ची आहे. विवेकानंद नगर येथील रितिक साहू आणि झगेंद्र साहू यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचविण्यासठी भोवऱ्यात उडी घेतली होती. 

- या घटनेच्या काही सेकंदातच एका मित्राचा बुडून मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या मित्र्याने त्या दोघांनी बुडण्यापासून वाचवले होते. रितिक आणि झगेंद्र यांना पोहता येत नव्हेत. 

- रितिक रायपूरच्या आदर्शनगर येथील रहिवासी आहे. तर झगेंद्रचे वडील सम्मनलाल यांचे निधन झाले असून तो रायपूरच्या पेंशनबाड़ा भागात राहतो. 

- राज्य सरकारने रितिक आणि झगेंद्र यांना त्यांच्या शौर्याबद्दल राज्य शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

 

प्रजासत्ताकदिनी मिळणार पुरस्कार

- 26 जानेवारी 2019 रोजी भारताचा 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. 1950 साली पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. 

- दक्षिण आफ्रिकेचे पाचवे आणि वर्तमान राष्ट्रपती  माटामेला सिरिल रामाफोसा हे 70व्या प्रजासत्ताक दिनचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...