आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी दाखवणार Train 18 ला हिरवा कंदील, दिल्ली ते वाराणसी करू शकता प्रवास; 2 फेब्रुवारीला होणार अंतिम चाचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : नवीन जलदगती रेल्वे Train 18 रुळावर धावण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली रेल्वे मंडळाने या ट्रेनला वंदे मातरम नाव देण्याची तयारी केली आहे. पण तत्पूर्वी दिल्ली रेल्वे मंडळ नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान एक अंतिम चाचणी करणार आहे. 


पंतप्रधान दाखवणार हिरवा कंदील 

रेल्वे सुत्रांनुसार अंतिम चाचणीनंतर पंतप्रधान Train 18 ला कधीही हिरवा कंदील दाखवू शकतात. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्यामुळे Train 18 धावण्यासपासून थांबली आहे. पंतप्रधानांकडून परवानगी मिळताच रेल्वेची ऑपरेटिंग सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकारी म्हणाले की, 4 ते 10 फेब्रुवारी दरम्यान ट्रेन ऑपरेटिंगसाठी तयार करण्यास सांगण्यात आले आहे.  


वाराणसीपर्यंत रेल्वेने प्रवास करणार पंतप्रधान

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला दिल्लीहून वाराणसीला रवाना करणार आहेत. तसेच पंतप्रधान Train 18 ने आपला निवडणुक मतदार संघ वाराणसीला जाण्याची शक्यता आहे. 


2 फेब्रुवारीला होणार चाचणी
बोर्डाच्या आदेशानंतर दिल्ली रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी Train 18 च्या चाचणीसाठी 2 फेब्रुवारी हा दिवस निश्चित केला आहे. या गाडीला निर्धारित 8 तासांत नवी दिल्ली ते वाराणसी अंतर पार करावी लागणार आहे. 2 फेब्रुवारीला होणाऱ्या या चाचणीदरम्यान Train 18 सकाळी 6 वाजता नवी दिल्ली स्थानकावरून वाराणसीसाठी प्रस्थान करणार आहे. 

 

रेल्वे याठिकाणी घेणार थांबा
सदर गाडी 10 मिनिटांसाठी प्रयागराज रेल्वे स्थानकाशिवाय इतर कोणत्याही स्थानकावर थांबणार नाही. 

 

130 किमी असणार वेग 
रेल्वेची चाचणी 180 किमी प्रति तास गतीवर करण्यात आली आहे. पण सीआरएसद्वारे मिळालेल्या सुरक्षा निर्देश लक्षात घेता दिल्ली ते वाराणसीचा प्रवासादरम्यान या गाडीचा वेग कमला 130 किमी प्रतितास असणार आहे. मार्गावरील रहदारी आणि रेल्वे रूळांची स्थिती पाहता या गाडीला 180 प्रति तास वेगाने न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
इतका असणार ट्रेन 18चे भाडे
अधिकाऱ्यांनी सांगितले की, Train 18 चे भाडे ठरवण्यात आले नाही. पण देशातील सर्वात लग्झरी आणि आधुनिक अशी खास रेल्वेतून प्रवास करण्यासाठी साधारण रेल्वे दरापेक्षा 30 टक्के अधिक शुल्क द्यावे लागणार.

 

बातम्या आणखी आहेत...