आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा महाकुंभ : मोदी म्हणाले, सबका साथ सबका विकास ही केवळ घोषणा नाही, भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - येथील जंबुरी मैदानावर पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर भाजपने कार्यकर्ता महाकुंभचे आयोजन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. सबका साथ सबका विकास ही केवळ निवडणुकीसाठीची घोषणा नसून लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग आहे. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोलही केला. वोट बँकेचे राजकारण हे वाळवीसारखे असते. ही वाळवी आपल्याला नष्ट करावी लागेल असेही मोदी यावेळी म्हणाले. मोदींपूर्वी बोलताना अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांना भाजपशी जोडण्याचा आदेशही दिला. 


काय म्हणाले मोदी...

#WATCH PM Narendra Modi addresses party workers in Bhopal. #MadhyaPradesh https://t.co/CMrVosQmHZ

— ANI (@ANI) September 25, 2018

- सबका साथ सबका विकास ही फक्त निवडणुकीसाठीची घोषणा नाही. तर देशाच्या कोट्यवधी नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही निवडलेला मार्ग आहे. 
- वोट बँकेचे राजकारण ही देशाला लागलेली वाळवी आहे, ती नष्ट करावी लागेल. 
- मोदी म्हणाले, पंडित दीन दयाल उपाध्‍याय यांचे चिंतन, त्यांचे विचार, जीवन आजही आपल्यासाठी प्रेरक आहे. 
- आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर हे महान नेते आणि बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्ज आहे, ते फेडण्याची संधी आपल्याला गमवायची नाही. 
- स्वातंत्र्यानंतर महात्‍मा गांधी, लोहिया आणि पंडित दीनदयाल उपाध्‍याय यांनी देशाला नव्या उंचीवर नेले. त्यांना विसरता येणार नाही. 
- मानवतेच्या मुद्द्यावर राजकारण करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. 
- 19 राज्यांच भाजपचे सरकार असणे अभिमानाची बाब आहे पण जगातील सर्वात मोठा पक्ष असणे ही त्याहीपेक्षा मोठी बाब. 

 

NRC थांबणार नाही-अमित शहा 
- अमित शहा म्हणाले की, भाजपसाठी देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, वोट बँकेचे राजकारण नाही. काँग्रेसने कितीही जोर लावला तरी देशहितासाठी आता NRC ची प्रक्रिया थांबणार नाही. 
- शहा म्हणाले, मोदींनी असे एकही काम केलेले नाही की, ज्यामुळे कार्यकर्त्यांची मान खाली जाईल. पंतप्रधान मोदी आणि शिवराज यांनी असे काम केले आहे की, कार्यकर्त्यांची मान ताठ होईल. 
- 10 सदस्यांपासून सुरू झालेल्या पक्षाचे आज 11 कोटी कार्यकर्ते आहेत. हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारताच्या 70 टक्के भागावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपची सत्ता आहे. 
- ज्याठिकाणी एकही आमदार नव्हता तेथे आम्ही सत्ता स्थापन केली, मग हे तर मध्यप्रदेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...