आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेत मोदी म्हणाले, 'नेते म्हणतात एनडीए विजयी झाले तरीही लोकशाही पराभूत झाली, ऐकून वाइट वाटते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी बोलताना मोदींनी विरोधीपक्षांच्या नेत्यांवर निशाणा साधला. काही नेते म्हणतात, की भाजप आणि एनडीए विजयी झाले, परंतु लोकशाहीचा पराभव झाला. हे विधान अतिशय दुर्दैवी असून ऐकून वाइट वाटते. मतदारांच्या निर्णयावर कसे काय प्रश्न उपस्थित केले जातात. अशा प्रकारची वक्तव्ये हा देशातील मतदारांना अपमान असल्याचे मोदी म्हणाले आहेत.


आणखी काय म्हणाले पंतप्रधान...
मतदारांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना घेरण्यासाठी मोदींनी वायनाड आणि अमेठीचे उदाहरण देऊन प्रश्न केले. "लोकशाहीचा पराभव झाला असे म्हटले जात आहे. मग, वायनाड, अमेठी आणि रायबरेलीत हिंदुस्थान पराभूत झाला आहे का? म्हणजे, काँग्रेसचा पराभव झाला तर देशाचा आणि लोकशाहीचा पराभव झाला असे समजायचे का? अंहकाराची देखील एक मर्यादा असते. 55 वर्षे देशात सत्ता गाजवणाऱ्या एका पक्षाला 17 राज्यांमध्ये एकही जागा मिळाली नाही. देशाच्या मतदारांनाच दोष देण्यास सुरुवात केली. लोकशाहीत टीकेला सन्मान दिला जातो. परंतु, देशातील मतदारांचा अवमान मन दुखावणारे आहे. माझे शब्द कठोर असू शकतात. परंतु, हे शब्द परिपक्व लोकशाहीसाठी आहेत."


तामिळनाडू आणि केरळमध्ये मीडिया विकत घेतलाय का?
मोदी आणि मीडियावर टीका करणाऱ्यांना सुद्धा पंतप्रधानांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मोदी म्हणाले, ''मीडियामुळे आम्ही निवडणुका जिंकलो असे सांगण्यात आले. आम्ही कुठे आहोत. मीडिया विकणारा आहे का, की ज्याला विकत घेता येईल? तामिळनाडू आणि केरळमध्ये ही गोष्ट लागू होईल का? संसदेत बोलण्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव अख्ख्या देशावर पडतो. आम्ही काहीही बोललो की त्या दैनिकांच्या हेडलाईन होतात. भारतातील निवडणूक प्रक्रिया साऱ्या जगात आपली प्रतिष्ठा वाढवण्याची एक संधी असते. त्याबद्दल आपल्याला गर्व असायला हवा. ही संधी गमवायला नको.''

बातम्या आणखी आहेत...