Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | pm narendra modi adresses rally at nashik for lok sabha election 2019

हा मोदी दहशतवाद्यांना पाताळातून सुद्धा शोधून काढेल! नाशिकच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 22, 2019, 03:18 PM IST

पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही दिले आश्वासन

 • pm narendra modi adresses rally at nashik for lok sabha election 2019

  नाशिक - लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी येथील पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सभा घेतली. यामध्ये मोदींनी काँग्रेस आणि आघाडीचा दहशतवादी हल्ल्यांवरून खरपूस समाचार घेतला. काँग्रेस आणि आघाडीच्या सरकारमध्ये देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. परंतु, आमच्या (भाजप) सरकारने दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर कारवाई केली. सोबतच, नाशिकच्या कांदा प्रश्नावर अप्रत्यक्षपणे बोलताना मोदी सरकार दलालांचे राज्य संपवण्यासाठी आग्रही आहे असे मोदींनी सांगितले आहे.


  हा मोदी दहशतवाद्यांना पाताळातून शोधून काढणार...
  नाशिकच्या दिंडोरी येथील जागेवरून भारती पवार आणि नंदुरबार येथून केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. दिंडोरीमध्ये भारती पवार राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना तर नंदुरबार येथून सुभाष भामरे यांची काँग्रेसशी थेट लढत आहे. नाशकात सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज प्रत्येक दहशतवाद्याला माहिती आहे. कुणीही भारतात बॉम्बस्फोट घडवला तर मोदी आहेच. हा मोदी त्यांना पाताळातून सुद्धा शोधून काढणार आणि त्यांना संपवणार हे त्यांना माहित आहे.


  शेतकऱ्यांवर काय म्हणाले मोदी...
  देशाचे संरक्षण, सन्मान आणि स्वाभीमानाची चौकीदारी आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपल्याला या चौकीदाराला मजबूत करावे लागेल. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यावर बोलताना, काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मिळणाऱ्या किंमतीशी खेळ केला आहे. शेतकऱ्यांना नव्हे, तर मध्यस्थ आणि दलालांना फायदा कसा मिळवून दिला जाईल यावर काँग्रेसचा भर होता. परंतु, 23 मे रोजी जेव्हा केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल तेव्हा, शेतकऱ्यांना सन्मान निधी योजना लागू केली जाईल. सोबत, मध्यस्थांची दलाली सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल.

  आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही
  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिंडोरीनंतर नंदुरबार येथील सभेला सोमवारी संबोधित केले. यावेळी त्यांनी आदिवासींना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का देखील लागू देणार नाही. त्यांच्या जमीनीवर कुठलेही संकट येऊ देणार नाही असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. एवढेच नव्हे, तर शेतकरी सन्मान योजनेतील 5 एकर मर्यादेची अट काढून टाकणार आणि सर्व शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळवून देणार असेही मोदींनी आश्वस्त केले आहे.

 • pm narendra modi adresses rally at nashik for lok sabha election 2019
 • pm narendra modi adresses rally at nashik for lok sabha election 2019

  फोटो - निलेश पाटील

Trending