Home | International | Other Country | PM Narendra Modi becomes most followed world leader on Instagram

PM मोदी बनले इंस्टाग्रामवर जगातील सर्वात जास्त Follow केले जाणारे नेते; तिसऱ्या क्रमांकावर Donald Trump

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 01:02 PM IST

वर्षभरातील 80 पोस्ट, फोटो आणि व्हिडिओंना जवळपास 873,302 प्रतिक्रिया आल्या आहेत.

 • PM Narendra Modi becomes most followed world leader on Instagram

  इंटरनॅशनल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर विक्रमाची नोंद केली आहे. ते इंस्टाग्रामवर जगातील सर्वात लोकप्रीय नेते ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. त्यांनी याच वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत एक फोटो इंस्टाग्राम केला होता. त्या फोटोला जेवढे लाइक मिळाले आहेत, तेवढे कुठल्याही देशाच्या नेत्याच्या इंस्टाग्राम पोस्टला मिळालेल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर जगातील दुसरा सर्वात जास्त पसंत केलेला जागतिक नेत्याचा इंस्टाग्राम फोटो सुद्धा पीएम मोदींचाच आहे. 2018 च्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये दावोस येथे त्यांनी बर्फाच्छधित परिसरात हा फोटो टिपला होता.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्रामवर जगातील सर्वात प्रभावी नेते ठरले आहेत. त्यांच्या वर्षभरातील 80 पोस्ट, फोटो आणि व्हिडिओंना जवळपास 873,302 प्रतिक्रिया आल्या आहेत. बर्सन-मार्सटेलर यांनी केलेल्या Twiplomacy Study 2018 मध्ये जगातील सर्वच नेत्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटचा आढावा घेण्यात आला. त्यात मोदींसोबत सर्वाधिक लोक संवाद साधतात आणि प्रतिक्रिया देतात असे समोर आले आहे.

  डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्या क्रमांकावर
  पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्रामवर नंबर एकचे जागतिक नेते ठरले आहेत. रिपोर्ट तयार करण्यासाठी अभ्यास सुरू असताना मोदींचे 1 कोटी 48 लाख फॉलोअर्स होते. आता या फॉलोअर्सची संख्या 1.55 कोटी पर्यंत गेली आहे. या बाबतीत इंडोनेशियाचे नेते जोको विदोदो दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक इंस्टाग्राम पोस्ट पसंत केल्या जाणाऱ्या इतर नेत्यांमध्ये ख्रिस्ती धर्माचे सर्वात मोठे धर्मगुगूर पोप फ्रान्सिस, जॉर्डनच्या राणी रानिया, ब्रिटनचे शाही घराणे इत्यादींचा समावेश आहे. तरीही या कुठल्याही नेत्यांच्या पोस्टची मोदींच्या इंस्टाग्राम पोस्टला मिळालेल्या लाइक आणि शेअरशी तुलना होऊ शकत नाही.

Trending