आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अंतराळ संशोधन आणि विकासाची सर्वात मोठी घोषणा केली. अंतराळ जगतात लो अर्थ ऑर्बिटमध्ये एका लाइव्ह सॅटेलाइटला हाणून पाडण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आले आहे. मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, ए सॅट अर्थात अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलने ही कारवाई करण्यात आली. मिशन शक्ती अंतर्गत अवघ्या 3 मिनिटांत निर्धारित लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात भारताला हे यश मिळाले आहे. या मोहिमेत अतिशय उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता होती, ती भारतीय वैज्ञानिकांनी पूर्ण केली. हा समस्त भारतीयांसाठी मोठा गर्वाचा दिवस आहे असे मोदींनी सांगितले आहे.
मिशन शक्ती पूर्णपणे यशस्वी
> यावर सविस्तर माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलच्या माध्यमातून भारताने एक सॅटेलाइट हाणून पाडल्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय वैज्ञानिकांनी एका पूर्वनिश्चित लक्ष्यावर यशस्वी हल्ला करून हे उपग्रह नष्ट केले. तसेच जागतिक अंतराळ संशोधनात भारताचे नावलौकिक केले आहे. भारताने या मिशनला मिशन शक्ती असे नाव दिले होते. भारताने असे करून नवीन क्षमता प्राप्त केली आहे.
> उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताने हे नवे तंत्रज्ञान आणि ताकद कुठल्याही देशाच्या विरोधात नाही तर एक विकासाचा भाग म्हणून विकसित केले आहे. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कुठल्याही चिथावणीसाठी करत नाही, तर 130 कोटी जनतेच्या संरक्षण आणि विकासासाठी करत आहोत. आमचा मूळ हेतू शांतता टिकवून ठेवणे आहे. आमच्या या यशस्वी प्रयोगाने कुठल्याही आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करण्यात आले नाही. समस्त भारतीयांना सुरक्षित ठेवणे हाच आमचा उद्देश आहे असे मोदींनी स्पष्ट केले.
अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलने उपग्रह उडवणारा भारत चौथा देश
उपग्रह विरोधी मिसाइलने सॅटेलाइट हाणून पाडण्यात सक्षम असलेला भारत जगातील चौथा देश बनला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनकडे हे सामर्थ्य होते. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, 300 किमी दूर असलेल्या निर्धारित लक्ष्याच्या सॅटेलाइटला अवघ्या 3 मिनिटांत ही मोहिम फत्ते करण्यात आली आहे. डीआरडीओने या यशस्वी मिशनमध्ये सर्वात मोठी कामगिरी केली. त्याबद्दल समस्त वैज्ञानिकांचे अभिनंदन असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
भारताची रेकी करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील शत्रू राष्ट्र
विशेष म्हणजे, हे सॅटेलाइट स्थिर नसून एक फिरते सॅटेलाइट होते. त्यावर सुद्धा उपग्रहविरोधी मिसाइलने यशस्वीरित्या निशाणा साधण्यात आले. त्यामुळे, यापुढे भारताची हेरगिरी करण्यासाठी उपग्रह पाठवणापूर्वी शत्रू राष्ट्रांना शंभरवेळा विचार करावा लागणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.