आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपेरी पडद्यावर \'PM नरेंद्र मोदी\' बनलेल्या विवेक ओबेरॉयची सोशल मीडियावर उडवली खिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबईत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. तब्बल 23 भाषांमध्ये सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. परंतु, नरेंद्र मोदी यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय याची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

 

'सिनेमात तू ना पीएम मोदी दिसतोय, ना विवेक ओबेरॉय', अशा शब्दांत एका युजरने म्हटले आहे. सिनेमात पीएम मोदी यांच्या भूमिकेसाठी विवेकऐवजी परेश रावल यांना कास्ट करायला हवे होते, असा एका युजरने सल्ला दिला आहे. 

 

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या संघर्षावर आधारित सिनेमाचे शूटिंग जानेवारीच्य मध्यंतरी सुरु होणार आहे. या सिनेमाची निर्मिती संदीप सिंग तर दिग्दर्शन उमंग कुमार करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...