Home | National | Other State | PM Narendra Modi celebrates diwali visits kedarnath news and updates

पंतप्रधान मोदींची पाचव्यांदा जवानांसोबत दिवाळी साजरी

वृत्तसंस्था | Update - Nov 08, 2018, 07:07 AM IST

२०१४ पासून मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदा उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत

 • PM Narendra Modi celebrates diwali visits kedarnath news and updates

  डेहराडून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पाचव्यांदा लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. उत्तराखंडमधील हर्षिल येथील कॅम्पमध्ये पंतप्रधानांनी जवानांची भेट घेतली. जवानांना मिठाई देऊन त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, पंतप्रधानांनी केदारनाथाचेही दर्शन घेतले. दीड वर्षात हा मोदींचा तिसरा केदारनाथ दौरा आहे.

  २०१४ पासून मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदा उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. ते म्हणाले, ‘देशातील वीर जवांनासोबत दिवाळीचा सण साजरा करण्याचे सौभाग्य मला लाभले. वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या सर्व माता-पित्यांना व त्यांना घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना मी नमन करतो. जेथे प्रकाश असतो तेथे वाईट काम करण्याचा विचार मनात येत नाही. दिवा स्वत: जळून जसा इतरांना प्रकाशमान करतो तसे हे जवान अपार कष्ट झेलून देशाला प्रकाशमान करतात’.

  जलाभिषेक करून मंदिराला प्रदक्षिणा
  जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर नरेंद्र मोदी केदारनाथला गेले. हेलिपॅडपासून जवळपास अर्धा किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी बाबा केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले. पूजा केली. येथे सुरू असलेल्या आणि नियोजित विकासकामांची पाहणीही त्यांनी केली. पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून नरेंद्र मोदी यांनी केलेला केदारनाथचा हा तिसरा दौरा आहे. या वेळी त्यांनी जलाभिषेक करून मंदिराला प्रदक्षिणाही घातली.

  आयटीबीपीशी जुने नाते
  आयटीबीपीशी जुने नाते असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले, कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली तेव्हा मी तेथे गेलो होतो. आयटीबीपीच्या जवानांसोबत घालवलेला ३९-४५ दिवसांचा काळ अजूनही आठवतो. बंदूक हाती घेऊन संरक्षण करण्याचे काम जवानांचे आहे. पण हेच जवान कधी भक्तांचे वजनदार साहित्य उचलायचे तर कधी आजारी लोकांना उंच चढण्यासाठी मदत करायचे तर कधी भक्तांमध्ये बसून भक्तिगीत गात. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी टि्वटरवर मोदी यांना हिंदी भाषेतून शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी हिब्रू भाषेत नेतन्याहूंचे आभार मानले.

  गेल्या वर्षी काश्मीरमध्ये साजरी केली होती दिवाळी
  मोदी यांनी गेल्या वर्षी काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१४ मध्ये सियाचीन, २०१५ मध्ये डोगराई वॉर मेमोरियल आणि २०१६ मध्ये मोदी हिमाचल प्रदेशात जवानांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.

Trending