आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी जमिनीवर बसून जेवताना तर कधी आईसोबत भांडी घासतांना दिसले \'पीएम मोदी\', बऱ्याच सीन्समध्ये डोळ्यात दिसले अश्रू : VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' चे पहिले गाणे 'कसम मुझे इस मिट्टी की' रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा बालपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. त्यांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा संघर्ष या गाण्यामध्ये दाखवला आहे. कधी बालपणीचे ते आपल्या कुटुंबासोबत जमिनीवर बसून जेवण करतांना दिसत आहेत तर कधी ते मोठे झाल्यानंतर आईसोबत भांडी स्वच्छ करतांनाही दिसत आहेत.  

पुष्कळ सीन्समध्ये डोळ्यात दिसत आहेत अश्रू...
गाण्यात गुजरातमध्ये झालेलं दंगे आणि काही दहशतवादी घटनाही दाखवल्या आहेत. या घटना घडल्यानंतर खचलेले नरेंद्र मोदी यांना रडतानाही दाखवले आहे. गाण्याच्या जास्तीत जास्त सीन्समध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रूच दिसले. याव्यतिरिक्त अमित शाह यांच्यासोबतची मोदींची मैत्री, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांचे राजकारणही पाहायला मिळाले. या गाण्याचे शब्द प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत तर मेघदीप बोस यांनी या गाण्याला म्युझिक दिले आहे. हे गाणे सुखविंदर सिंग आणि शशि सुमन यांनी गायले आहे. ओमंग कुमार यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेली ही फिल्म 5 एप्रिलला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...