आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेत मोदी म्हणाले, देशाच्या जनतेने ठरवले, पुन्हा येणार मोदी सरकार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मेरठ येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करत पहिली जाहीर सभा घेतली. यात मोदी म्हणाले, ही लोकसभा निवडणूक लोकांचे स्वप्न आणि अपेक्षांविषयी आहे. 5 वर्षांपूर्वी मी लोकांचा आशीर्वाद मागितला होता. 5 वर्षे काम करून जनतेला माझा रिपोर्ट कार्ड दाखवणार आणि 60 वर्षांत त्यांनी (काँग्रेसने) काय केले हे दाखवणार असे म्हणालो होतो. देशाच्या जनतेनेच ठरवले आहे की 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा मोदी सरकारच येणार आहे. हीच देशातील 130 कोटी जनतेची इच्छा आहे असे मोदींनी सांगितले आहे.

 

चौकीदाराच्या सरकारमध्ये सर्जिकल स्ट्राइकचे धाडस...
पीएम मोदींनी आपल्या प्रचार सभेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकचा देखील उल्लेख केला. चौकीदाराच्या सरकारने दाखवलेल्या धाडसानंतर सर्जिकल स्ट्राइक घडवण्यात आले आहेत. शत्रूंपासून सुरक्षित राहण्यासाठी भारताला विकसित व्हावेच लागणार आहे असे मोदी म्हणाले. पीएम मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यामध्ये मेरठ येथील पहिल्या प्रचार सभेला संबोधित केल्यानंतर ते उत्तराखंडच्या रुद्रपूर आणि त्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर येथे जाणार आहेत. या सर्वच ठिकाणी पंतप्रधान भाजपचा प्रचार करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे.

 

"जो खाते उघडू शकत नाही तो पैसे काय टाकणार?"
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या आश्वासनाचा सुद्धा खरपूस समाचार घेतला. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यास देशातील 20 टक्के गरीब जनतेच्या खात्यात थेट 72 हजार रुपये वार्षिक जमा करणार असे आश्वासन दिले आहे. यावर टीका करताना, जी व्यक्ती लोकांचे बँक खाते सुद्धा उघडू शकत नाही, ती व्यक्ती लोकांच्या खात्यात पैसे कसे टाकणार असा सवाल मोदींनी केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कथितरित्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते.

 

ए-सॅट काही लोकांना थिएटरचा सेट वाटतो...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी दुपारी भारत अंतराळात महासत्ता बनल्याची घोषणा केली. भारताने यशस्वीरित्या अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलने उपग्रह हाणून पाडल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एक ट्वीट करून मोदींची थट्टा केली होती. त्याचा देखील पंतप्रधानांनी खरपूस समाचार घेतला. काही लोकांना सेट आणि ए-सॅट यातील भरत सुद्धा कळत नाही. त्यांना अॅण्टी सॅटेलाइट हा थिएटरचा सेट वाटतो असा चिमटा मोदींनी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...