आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदी ठरले Champions Of The Earth; संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाचा सर्वात मोठा पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र - पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त राष्ट्राने Champions of the Earth 2018 हा पुरस्कार बुधवारी जाहीर केला. यूएनकडून पर्यावरण संदर्भात दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. 2022 पर्यंत मोदींनी भारतात सिंगल प्लास्टिक वापर बंदची हाक दिली. त्यांच्या याच प्रयत्नाला यूएनमध्ये गौरवण्यात आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्मान्यूल मॅक्रॉन यांना देखील पर्यावरणासाठी जागतिक करारासाठी याच विभागात हा सन्मान देण्यात आला.

 

PM @narendramodi has been awarded the prestigious @UN Champions of the Earth Award.

President @EmmanuelMacron and Shri Modi have been awarded in the Policy Leadership category, for their efforts regarding the International Solar Alliance. https://t.co/zSNk3lS3uy

— PMO India (@PMOIndia) 26 September 2018

 

यूएनतर्फे जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंटनुसार, "पर्यावरणासाठी जगातील सर्वात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांपैकी 6 जणांचा आज Champions of the Earth Award देऊन गौरव केला जात आहे. पर्यावरण क्षेत्रात कामगिरीसाठी यूएनकडून दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. दरम्यान, कोचिन आंतरराष्ट्रीय विमानाला सुद्धा पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर केल्याबद्दल आंत्र्योप्रिन्योर व्हिजनसाठी सन्मानित करण्यात आले आहे. हे विमानतळ जगातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ आहे. त्याबद्दल संयुक्त राष्ट्राने विमानतळाचा सन्मान करताना तोंडभर कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...