आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Govt Maiden Parliament Session Passes 10 Ordinances In Lok Sabha Rajya Sabha

शिक्कामोर्तब! ट्रिपल तलाकविरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी, एनडीए-2 च्या पहिल्याच संसदीय अधिवेशनात मंजूर झाली 10 विधेयके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गाम्बिया दौऱ्यावरून परतताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रिकल तलाकविरोधी विधेयकावर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने गुरुवारी मुस्लिम महिला-विवाह अधिकार संरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए-2 सरकारने पहिल्याच संसदीय अधिवेशनात तब्बल 10 विधेयकांना मंजुरी दिली. 17 व्या लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळालेली सर्वच विधेयके मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली. नवीन कायद्यानुसार, यापुढे मुस्लिम समाजात ट्रिपल तलाक देणाऱ्या दोषी पुरुषास 3 वर्षांची कैद होणार आहे. सोबतच, पीडित महिला आणि त्यांची अल्पवयीन मुले भरपाई आणि भत्त्यांची मागणी करू शकतील.

या सर्वच 10 विधेयकांमध्ये ट्रिपल तलाक बिल अर्थात मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक 2019 सर्वात महत्वाचा होता. तीन तलाक विधेयकाला मंगळवारीच राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. राज्यसभेत विधेयकाच्या समर्थनात 99 तर विरोधात 84 मते पडली होती. हे विधेयक 25 जुलै रोजीच लोकसभेत मंजूर झाले होते.

1. मुस्लिम महिला (विवाह अधिकार सरंक्षण) विधेयक 2019
2. भारतीय चिकित्सा परिषद (संशोधन) विधेयक 2019
3. कंपनी (संशोधन) विधेयक 2019
4. अनियमित जमा योजनांवरील प्रतिबंध विधेयक 2019
5. जम्मू आणि काश्मीर आरक्षण (संशोधन) विधेयक
6. आधार आणि इतर कायदा दुरुस्ती विधेयक 2019
7. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र विधेयक 2019
8. होमियोपॅथी केंद्र परिषद (संशोधन) विधेयक 2019
9. विशेष आर्थिक क्षेत्र (संशोधन) विधेयक 2019
10. केंद्रीय शैक्षिक संस्थान (शिक्षकांत सवर्णांना आरक्षण) विधेयक 2019