आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी मुलीची घेतली भेट
  • पीएम मोदींची पोलिस प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेला देखील उपस्थिती

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पुण्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांच्या हस्ते राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी पीएम मोदींनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.

यावेळी लेफ्टनंट कर्नल आर.आर. जाधव, श्रीमती उमा कुणाल गोसावी, उमंग कुणाल गोसावी, नाईक नंदकुमार रंगराल चावरे, सुभेदार संजय कुमार मोहिते, एनसीसी विद्यार्थी एसयूओ अमंग रुपेली, जेयूओ संकेत कदम, जेयूओ विजयश्री सुरदे, एसजीटी प्रिती जगदाळे, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे इत्यादी लोक उपस्थित होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या पत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला तसेच सर्वांसोबत छायाचित्रे सुद्धा घेतली.

मोदींनी घेतली पोलिस प्रमुखांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ केल्यानंतर शनिवारीच राज्यातील पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती नोंदवली. पुण्यात शुक्रवारी सुरू झालेली ही काँफ्रन्स रविवारपर्यंत चालणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही उपस्थिती लावली.