Home | Business | Business Special | PM Narendra Modi is the most popular world leader on Facebook

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले Facebook किंग, जगातील दिग्गज नेत्यांना मागे टाकत आले नंबर-1 पोझिशनवर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 01:18 PM IST

मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

  • PM Narendra Modi is the most popular world leader on Facebook

    नवी दिल्ली- जिथे जगातील दिग्गज नेते आपल्या फेसबूक पेजला प्रमोट करण्याच्यासाठी पैसे खर्च करतात, तिथे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असे काही केल्याशिवाय सोशल वेबसाइटवर किंग बनले आहेत. 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबूकच्या रिपोर्टनुसार मोदींच्या खासगी फेसबूक पेजवर 4.35 कोटी लाइक्स आहेत तर तर त्यांच्या अधिकृत फेसबूक पेजला 1.37 कोटी लाईक्स आहेत. मोदी फक्त फेसबूक पेजवरच नाही तर ट्विटर,इंस्टाग्राम आणि यू-ट्यूबवरदेखील फेमस आहेत. ट्विटरवर त्यांचे 4 कोटी 70 लाख फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर अंदाजे 19.9 मिलियन फॉलोअर आहेत.


    दुसऱ्या नंबरवर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप
    वर्ल्ड लीडर ऑन फेसबूकच्या रिपोर्टमध्ये मोदीनंतर दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आहेत, ज्यांच्या फेसबूक पेजला 2.30 कोटी लोकांनी लाइक्स केले आहे.

Trending