आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माेदी मास्तरांनी पुन्हा एकदा घेतला कलम 370 चा तास; महाराष्ट्राच्या निवडणुकाही देशभक्तीवरच लढणार, पहिल्याच सभेत पंतप्रधान माेदींचे संकेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देखील भाजप देशभक्तीचेच कार्ड वापरणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगावात दिले. राज्यातील पहिलीच प्रचारसभा जळगावात आयोजित करण्यात आली होती, त्यात मोदी मास्तरांनी पुन्हा एकदा कलम 370 रद्द करणे, तीन तलाक आणि आवास योजनांचा पाढा वाचला. राज्याच्या विषयाला आणि स्थानिक राजकारणाला फाटा देत पुन्हा फडणवीसांच्या सत्तेसाठी मते मागून ते पुढच्या सभेसाठी रवाना झाले.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असतांना पंतप्रधान यांनी रविवारी जळगावापासून राज्यात प्रचारसभांना प्रारंभ केला. राज्यातील पहिलीच सभा असल्याने माेदी काय बाेलतात याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून हाेते. विरोधकांच्या अपेक्षेप्रमाणे माेदींनी या सभेत देशभक्ती, कलम ३७० आणि ट्रीपल तलाक या विषयांना हात घेतला. केंद्रीय याेजनांच्या पाढ्याची उजळणी करतांना महाराष्ट्रातील स्थानिक विषयावर मात्र त्यांनी बाेलणे टाळले. साेशल मिडीयावरील एका व्हिडीआेचा संदर्भ देत शरद पवारांवर नाव न घेता टीका करीत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेसाठी मते मागितली. मुख्यमंत्री फडणवीस वगळता काेणाचेही नाव न घेता त्यांनी ४० मिनिटांचे भाषण केले. ‘कसं कायं जळगाव’ या मराठी शब्दांनी माेदींनी भाषणाला प्रारंभ केला. पंतप्रधान आवास योजना, शेतकरी पीकविमा याेजना, जलजीवन मिशन, जलयुक्त शिवार अभियान, मनमाड-इंदाैर रेल्वेमार्ग, औद्याेगीकरण, विमानसेवा या योजनांची पंतप्रधान नरेंद्र माेदींनी उजळणी दिली. यावेळी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्यासह ११ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उपस्थित हाेते.

महाराष्ट्राशी संबधित नसलेल्या मुद्यावर विरोधकांना आव्हान......
यावेळी केंद्र सुचीमध्ये येणाऱ्या आणि महाराष्ट्र शासनाशी अजिबात संबधित नसलेल्या कलम ३७० रद्द करणे, ट्रीपल तलाक पुन्हा सुरू करणे हे विषय विरोधकांनी हिम्मत असेल तर त्यांच्या जाहीरनाम्यात घ्यावे असे अजब आव्हान पंतप्रधान नरेंद्र माेदींनी केले. विरोधकांनी कलम ३७० ला विराेध केल्याने ते कसे देशाचे विरोधक आहेत. नव्या भारतासाठी विरोधक कसे घातक आहेत यावर माेदींनी लक्ष वेधले. थकलेले विरोधी पक्ष एकमेकांचा सहारा हाेवू शकत नाहीत तर राज्याला स्थिर सरकार कसे देणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.