आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ओम’ अन् ‘गाय’ शब्द ऐकताच इथे काही जणांचे केस उभे राहतात : मोदी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मथुरेत ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानासह राष्ट्रीय पशुरोग निर्मूलनचा प्रारंभ केला. जनावरांतील लाळ्या खुरकूत रोगाचे उच्चाटन व लसीकरणाशी संबंधित योजनांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी ओम व गाय यांच्यावरून विरोधक आणि टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले, काही लोकांचे ओम ऐकताच कान उभे राहतात, तर गाय शब्द ऐकताच त्यांना जणू विजेचा झटका बसतो व त्यांचे केस उभे राहतात, हे या देशाचे दुर्दैव आहे. त्यांना वाटते की देश अद्याप १६ व्या-१७ व्या शतकातच आहे. 

बातम्या आणखी आहेत...