आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन मेट्रो मार्गांबरोबरच मेट्रो भवनाचे केले भूमिपूजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदींनी मोदींचे स्वागत केले. यानंतर त्यांनी येथील लोकमान्य सेवा संघातील गणेशाचे दर्शन घेतले. मोदी मुंबईतील मेट्रो भवनाची पायभरणी करण्यात आली. यावेळी त्यांनी मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. 
 
मुंबईतील बीकेसी येथील जिओ गार्डन संकुलात आयोजित मेट्रोचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गांबरोबरच मेट्रो भवनाचेही भूमिपूजन केले. १५४ मीटर उंच ३२ मजल्यांच्या या इमारतीमधून मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये भविष्यात निर्माण होणाऱ्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो जाळ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये मेक-इन-इंडिया कार्यक्रमांतर्गत देशात प्रथमच बनवण्यात आलेला पहिला मेट्रो कोच प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला असून हा अत्याधुनिक कोच बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष लागते. परंतु हा कोच ७५ दिवसांत तयार करण्यात आला आहे. या अत्याधुनिक मेट्रो कोचमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सोयी आहेत तसेच प्रवाशांच्या सायकली टांगण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

या कार्यक्रमादरम्यान महामुंबई मेट्रोच्या ब्रँड व्हिजन पुस्तिकेचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.  यानंतर नरेंद्र मोदी औरंगाबादला जाणार असून तेथे महिला सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला सक्षम मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
 
 

बातम्या आणखी आहेत...