आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीमध्ये 9 दिवस असे राहील पीएम मोदी यांचे डाएट, या 2 गोष्टी विशेषतः असतील आहारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून हा उत्सव 18 ऑक्टोबरपर्यंत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदीही देवी दुर्गाचे मोठे भक्त आहेत. त्यांनी ट्विट करून समस्त देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी मागील 40 वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करत आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांचे संपूर्ण उपवास मोदी करतात. या दरम्यान ते फ्रुट्स, पाणी आणि लिंबूपाणी घेतात. मीडिया रिपोर्टनुसार, मोदी यांच्या उपवासाचा नियम मागील 40 वर्षांपासून तुटलेला नाही. सुनियोजित दिनक्रम आणि शिस्त हे वयाच्या 68 व्या वर्षातही त्यांच्या एनर्जीचे रहस्य आहे.


उपवासातही हे नियम मोडत नाहीत मोदी 
- ते सकाळी 4 वाजता उठतात.
- नवरात्रीमध्ये फक्त एक वेळेस फलाहार घेतात.
- दिवसा लिंबूपाणी घेतात.
- मोदी वर्षातील दोन नवरात्रीमध्ये उपवास करतात.


कसे ठेवतात स्वतःला फिट 
- सकाळी 4 वाजता उठल्यानंतर योगा करतात. सूर्यनमस्कार, प्राणायामसुद्धा त्यांच्या एनर्जी आणि फिटनेसचे रहस्य आहे.
- वॉक डेली रूटीनमध्ये समाविष्ट आहे.
- दिवसभरातून अनेकवेळा डीप ब्रीदिंग करतात. यामुळे फुप्फुसामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहतो आणि बॉडीला एनर्जी मिळते.
- सकाळी पोहे, खाकरा, भाकरी आणि अद्रकाचा गुजराती चहा घेतात.
- शुद्ध शाकाहारी आहेत. जेवणामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्ससोबत साधे गुजराती किंवा दक्षिण भारतीय जेवण करणे पसंत करतात.
- एकाच वेळी खूप जास्त खात नाहीत याउलट थोड्या-थोड्या वेळाने फ्रुट्स किंवा हलका स्नॅक्स घेतात.
- दिवसभरात अनेकवेळा कोमट पाणी पितात.
- उपवास काळात फक्त लिंबूपाणी घेतात. यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि एनर्जी लेव्हल कायम राहते.
- नियमितपणे मेडिटेशन करतात.
- 3 ते 4 तासांची झोप घेतात.
- स्मोकिंग आणि ड्रिंकपासून पूर्णपणे दूर राहतात.

बातम्या आणखी आहेत...