आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलम 370 आणि महाराष्ट्राचा संबंध विचारणाऱ्यांना मोदी म्हणाले, डूब मरो! अकोल्यातील सभेत घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोल्यात प्रचार सभा घेतली. पंतप्रधानांनी यावेळी केवळ कलम 370 चा विषयच काढला नाही, तर त्यावर टीका करणाऱ्यांचाही खरपूस समाचार घेतला. काही लोक विनाकारण महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चा संबंध नसल्याचे म्हणत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या परिस्थितीचा महाराष्ट्राशी संबंध नाही असे दावे करत आहेत. परंतु, जम्मू आणि काश्मीरचे लोक सुद्धा भारत मातेचे पुत्र आहेत हे विसरू नका असे पंतप्रधान म्हणाले.

यापुढे मोदी म्हणाले, एकेकाळी नेहमीच महाराष्ट्रात दहशतवाद आणि द्वेषाच्या घटना घडत होत्या. आता ते गुन्हेगार पसार झाले आणि दुसऱ्या देशांमध्ये स्थायिक झाले. संपूर्ण भारताकडून त्यांच्यासाठी प्रश्न आहे, की त्यावेळी कोणाची सत्ता होती. ते पळू कसे गेले? असे म्हणताना मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला.