आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदीही करत आहेत हृतिकच्या वडिलांसाठी प्रार्थना, म्हणाले - ते एक फायटर आहेत, राकेश रोशन यांना झाला घशाचा कँसर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांना घश्याचा कँसर झाला आहे. स्वतः हृतिकने त्यांच्या चाहत्यांना हे वृत्त दिले. सध्या कँसरची सुरुवात आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन राकेश रोशन यांच्या बरे होण्याची प्रार्थना केली. पंतप्रधानांनी लिहिले की, 'डियर हृतिक मी राकेश रोशन यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतोय. ते एक फायटर आहेत आणि मुला विश्वास आहे की, ते या आव्हानाचा हिंमतीने सामना करतील.'

 

Dear Hrithik, praying for the good health of Shri Rakesh Roshan Ji. He is a fighter and I am sure he will face this challenge with utmost courage. @RakeshRoshan_N https://t.co/Z0IaYSS4A4

— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2019

Ex सून सुजैन म्हणाली 
राकेश रोशन यांनी लवकर बरे व्हावे म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. याच काळात त्यांची सून राहिलेली सुजैन खानने सोशल मीडियावर लिहिले की, - 'ते कोणत्याही सुपरहीरोपेक्षा कमी नाही, ते खुप मजबूत आहेत, सर्व काही ठिक होईल.'

 

हृतिकने शेअर केला भावनिक मॅसेस 
हृतिकने आपले वडील राकेश रोशन यांच्यासोबत फोटो शेअर करताना लिहिले, "आज सकाळीच मी डॅडसोबत हा फोटो क्लिक केला आहे. मला माहिती होते की सर्जरीच्या दिवशी सुद्धा ते आपले जिम सेशन मिस करणार नाहीत. ते माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत व्यक्ती आहे. त्यांना घशाचा कर्करोग आहे आणि हा कर्करोग प्राथमिक स्टेजला आहे. एक परिवार म्हणून आम्ही खूप भाग्यशाली आहोत की आम्हाला असा लीडर मिळाला."

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...