आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विरोधक शिवस्मारकाबाबत गैरसमज निर्माण करत आहेत', मुंबईत मोदींचा विरोधकांवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. त्यामुळेच सर्व पक्षातील नेते दिवसातून अनेक प्रचारसभा घेत आहेत. आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थित महायुतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी, पाच वर्षात महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. 

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, विरोधक शिवस्मारकाबाबत गैरसमज निर्माण करत आहेत. सरकार शिवस्मारकासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळताच शिवस्मारकाचे काम सुरू होणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं. या शहरात घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असे.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणी काहीही प्रयत्न केले नाहीत. उलटं, आघाडीने तर आदर्श घोटाळा करुन लष्करातल्या जवानांच्या घराबाबतही घोटाळा केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने यांचा विचार केला नाही. भाजपानेच प्रत्येकांचे घर मुंबईत असावे हा विचार केला. विरोधकांनी मुंबईत 16 वर्षात फक्त 11 किमीची मेट्रो उभारली. ही गती तर कासवापेक्षाही कमी आहे. पण आमचे सरकार येत्या काळात मुंबईत मेट्रोचे जाळे उभारणार आहे, असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले.पंतप्रधान नेरंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
> मुंबई देशाची फायनान्शियल कॅपिटल
> पक्षापेक्षा मोठा आमच्यासाठी देश
> मुंबईत कधीही बॉम्बस्फोट व्हायचे
> आता दहशतवाद्यांना शिक्षा मिळत आहे
> कलम 370 आणि 35A हटवले
> काँग्रेसचा विचार देशाला मागे नेणारा
> सरकारमध्ये पारदर्शकता आणली
> रोजगार उत्पन्न करणाऱ्यांचा आम्ही सन्मान केला
> आधीच्या सरकारमध्ये मंत्रलयातील स्ट्रक्चवर अधिक लक्ष
> पाच वर्ष महाराष्ट्राला स्थिर सरकर दिले
> देशाला लुटणारे आज जेलची हवा खात आहे
> बेईमान लोकांना शिक्षा होणारच
> झुकणे हे आमच्या रक्तातच नाही
> 1993 च्या बॉम्बस्फोटांच्या जखमा अजुनही ताज्या
> शिवस्मारकाबाबत विरोधकांनी गैरसमज निर्माण केले
> महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकर येणार 

बातम्या आणखी आहेत...