आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंच्या विरोधात मैदान सोडून का पळाले? पंतप्रधान नरेंद माेदींचा शरद पवारांना सवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय मांडके | सातारा

'काँग्रेस-राष्ट्रवादीवाले सातारा हा आपला बालेकिल्ला म्हणतात. पण, येथून लोकसभेला उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उभे राहायला कोणी तयारच हाेत नव्हते. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी शरद पवारांनी आग्रह धरला, पण त्यांनी पवारांनाच उभे राहण्यास सांगितले. पण, शरदरावांना वाऱ्याची दिशा अचूक समजते. त्यामुळे त्यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला. जर बालेकिल्ला अाहे, तर मग पवारांनी उदयनराजेंविराेधात न लढता पळ का काढला,' असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी सातारा येथील प्रचार सभेत केला.

मोदींनी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील स्थानिक अस्मितांनाही स्पर्श करून लोकांच्या भावनेला हात घातला. 'जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या गावाने देशाच्या रक्षणासाठी आपली मुले समर्पित केली आहेत. त्यामुळे ज्यावेळी जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो, तेव्हा त्याचे सर्वाधिक दु:ख या भूमीला होते. कलम ३७० संदर्भात अफवा पसरवल्या जातात, तेव्हा येथील लाेक संतापतात,' असे सांगून माेदींनी कास पठार, वजराईचा धबधबा याचेही काैतुक केले. 

भिडे गुरुजींचे वॉकआऊट

सभेत उदयनराजेंचे भाषण सुरू असताना भिडे गुरुजी यांचे आगमन झाले. व्हीआयपी कक्षापर्यंत पोलिस बंदोबस्तात ते पोहोचले. परंतु व्यासपीठावर त्यांना काेणीच आमंत्रित केले नाही. किंवा भाषणातही त्यांची दखल घेतली नाही. वास्तविक त्यांना मोदी यांचा सत्कार करायचा होता. परंतु कोणी दखलच न घेतल्यामुळे भिडे गुरुजी आल्या पावली परत गेले.

बातम्या आणखी आहेत...