आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी शिवाजी महाराजांचे संस्कार होते, आता त्यांचे कुटुंब आमच्यासोबत, साताऱ्यात मोदींजी जाहीर सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज साताऱ्यात सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. कलम 370 वरून सरकारची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, आतापर्यंत शिवाजी महाराजांचे विचार आणि संस्कार आमच्याकडे होते, पण आता त्यांचा संपूर्ण परिवार आमच्याकडे आला आहे, असे मोदी म्हणाले. 
मोदी म्हणाले की, काँग्रेसवाले साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानत होते. मात्र, आता इथून त्यांना माघार घ्यावी लागली. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे ते सांगतात. मात्र, इथून खुद्द शरद पवारांनीही उभे राहण्याचे टाळले कारण हवेची दिशा त्यांना चांगली समजते. ते राजकारणातील मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवायला विरोध केला. तसेच साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद आहे, ही बाब खुद्द पृथ्वीराज चव्हाणांनीच एका मुलाखतीत सांगितल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची ही स्थिती आहे, इथे ते एकमेकांना आपली लायकी दाखवत आहेत. सातारचा दौरा आपल्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील अपशिंगे गावाचा आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, इथल्या अपशिंगे मिल्ट्री गावाने राष्ट्रसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याला राष्ट्रप्रेमाचा आणि त्यागाचा इतिहास आहे. त्यामुळेच जेव्हा राफेल सारख्या आधुनिक लढाऊ विमानांचा विरोधक अपप्रचार करतात, कलम 370 हटवण्याला विरोध करतात, वीर सावरकरांना विरोध करतात तेव्हा साताऱ्याचा पारा चढलेला असतो. 


यावेळी साताऱ्याच्या गादीचे कौतुक करताना मोदी म्हणाले, आजवर भाजपाकडे शिवाजी महाराजांचे केवळ संस्कार होते आता त्यांचे कुटुंबीयही आमच्यासोबत आहेत. गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने केंद्रातही आणि राज्यातही शिवाजी महाराजांच्या संस्काराप्रमाणे काम केले. सातारा जिल्ह्याला देशातल्या पहिल्या 15 पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळवून देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
उदयनराजेंनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, काँग्रेसने सत्तेचे केंद्रीकरण केले, फक्त घोषणा केल्या. सामान्य जनतेला याचा काहीही लाभ झाला नाही. 15 वर्षात केवळ भ्रष्टाचार झाला. मोदींजींचे नाव घेताना अभिमान वाटतो. मोदी देशातील "आयर्न मॅन" आहे, ते नव्या भारताचे लोहपुरूष आहेत अशी स्तुतीसुमने त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी उधळली.
पुढे बोलताने राजे म्हणाले की, राजीनामा देण्यासाठी हीच वेळ योग्य वाटली. मोदींसोबत जाण्याची मागणी समर्थकांनी केली म्हणून मी मोदींसोबत आलो. जे माझ्या बारश्याला हजर होते ते आज माझ्याविरोधात उभे आहेत, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतांमधून आशीर्वाद दिला. मात्र यामुळे त्यांचा अहंकार वाढला. हा अहंकार मोडून काढायचा आहे अशीही टीका उदयनराजेंनी केली.
 

बातम्या आणखी आहेत...