आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगाल : मोदींना 15 मिनिटांत संपवावे लागले भाषण, म्हणाले आता कळले हिंसाचाराचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी पश्चिम बंगालच्या ठाकूरपूरमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी झालेली प्रचंड गर्दी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने मोदींना 15 मिनिटांत भाषण संपवावे लागले. मोदींनी गर्दीकडे इशारा करत म्हटले की, ममता दीदी हिंसाचार का करू लागल्या आहेत हे मला समोरची गर्दी पाहिल्यानंतर लक्षात आले आहे.  


पंतप्रधान ठाकूरपूरमध्ये मटुआ समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी म्हणाले, मी कालच म्हटले की हा अर्थसंकल्प तर फक्त सुरुवात आहे. जेव्हा पूर्ण बजेट येईल तेव्हा शेतकरी, तरुण आणि कामगारांची स्थिती आणकी चांगली होईल.  


बजेटचा 45-55 कोटी लोकांना फायदा होणार असल्याचा दावा 
मोदी म्हणाले, बजेटमध्ये ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे देशातील 12 कोटींपेक्षा जास्त लहान शेतकरी कुटुंबे, 30-40 कोटी श्रमिक, मजूर बांधव आणि 3 कोटींपेक्षा जास्त मध्यमवर्गीय कुटुंबाना थेट फायदा होणार आहे. 
 

कर्जमाफीच्या नावाखाली गैरव्यवहार 
मोदी म्हमाले, आपल्या देशातील शेतकऱ्यांबरोबर कर्जमाफीच्या नावाखाली त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे. स्वार्थी पक्ष शेतकऱ्यांचे काहीही भले करत नव्हते. तुम्ही पाहिले असेल कताही राज्यांमध्ये तर कर्जमाफीच्या नावाखाली मते मागण्यात आली. आता कधी कर्ज न घेतलेल्यांचेच कर्ज माफ केले जात आहे. काही शेतकऱ्यांचे तर 13 रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. हे सर्व मध्यप्रदेशात सुरू आहे. तर राजस्थानातील लोक तर म्हणत आहेत की कर्जमाफी करणे एवढे कठीण असेल असे वाटले नव्हते. कर्नाटकात शेतकऱ्यांमागे पोलिस पाठवण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...