आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Reaches Varanasi To Thank Voters, Offers Worship At Kashi Vishwanath Temple

काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर मोदींनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद, विजयानंतर प्रथमच वाराणसीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी(उत्तर प्रदेश)- लोकसभेत मोठा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आपला मतदारसंघ वाराणसीत पोहचले. भाजप अध्यक्ष अमित शाह हेदेखील त्यांच्यासोबत होते. दोन्ही नेत्यांनी यावेळेस बाबा विश्वनाथ मंदिरमध्ये पुजा-अर्चना केली. यावेळी मोदींनी दीनदयाळ हस्तकला संकुलात भाजप कार्यकर्त्यांसोबत संबाद साधला. वाराणसी मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळव्यानंतर मोदींचा हा पहिला वाराणसी दौरा आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी याठिकाणी रोड-शो केला होता, त्यावेळी विजय मिळवल्यावर आभारासाठी परत येईल असे मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले होते.


बाबतपूर एअरपोर्टवरून मोदी पोलिस लाइनपर्यंत हेलिकॉप्टरने गेले. पोलिस लाइनमधून मंदिरापर्यंत त्यांनी कारमधून प्रवास केला. यावेळीही रोड-शो सारखेच दृष्य होते. हा अधिकृत रोड-शो नव्हता, म्हणून मोदींनी कारमधूनच नागरिकांना अभिवाद केले.


लालपूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत संवाद
मंदिरामध्ये पुजेनंतर मोदी वापस पोलिस लाइनला आले आणि तिथून लालपूरच्या बुनकर हस्तकला संकुलाकडे रस्त्याने निघाले. येथे त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. 2014 मध्ये वाराणसीतून निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा हा 21 वा वाराणसी दौरा आहे.


यावेळी मोदी म्हणाले
''पक्ष आणि कार्यकरते जे आदेश देतील, त्याचे पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. एका महिन्यापूर्वी 25 तारखेला मी इथे होतो, तेव्हा काशीने मला आन-बान आणि शानसोबत एक विराट रूपाचे दर्शन घडवून आणले होते. त्या रूपाने संपूर्ण भारताला प्रभावित केले. भारताचा कोणताच असा कोपरा नसेल, जिथे काशीमधले वातावरण पोहचले नसेल. कार्यकर्त्यांनी मला आदेश दिला होता की, आता एक महिन्यापर्यंत तुम्ही काशीत प्रवेश करू नका. देशाने मला भलेही पंतप्रधान बनवले असेल, पण तुमच्यासाठी मी एक सामान्य कार्यकर्ताच आहे.''

 

काशीबद्दल निश्चिंत होतो
"18-19 तारखेला वाटले होते की, काशीला जाऊ यावे, पण तुम्ही आदेश दिला होता. कोणताच उमेदवार निवडणुकीदरम्यान माझ्या इतका निश्चिंत नसेल. याचे कारण मोदी नाही, तर तुमचे परिश्रम आहे. निकाल आला तेव्हाही निश्चिंत होतो, मस्त मी केदारनाथमध्ये बाबाच्या चरणी जाऊन बसलो होतो."

 

"काशीतर अविनाशी आहे. तुम्ही लोकांनी इतके कार्यक्रम केले, मला सगळी माहिती मिळायची. येथील लोकांनी निवडणुकीला एक उत्सवासारखे रूप दिले होते. या निवडणुकीत तु-तु, मै-मै खूप कमी झाली. या निवडणुकीत इथर पक्षातील लोकांनाही मी धन्यवाद देतो, त्यांनी अत्यंत शांतीपूर्ण पद्धतीने काम केले."

 

"यावेळी अनेक कार्यकर्ते भेटले, त्यांनी मी म्हणालो होतो की, येथे अर्द तर एका नरेंद्र मोदीने भरला आहे, पण इथे घरा-घरात एक नरेंद्र मोदी आहे. प्रचारामुळे तुम्ही सगळे मोदी बनला आहात. या पूर्ण अभियानाला तुम्ही चालवले."


यावेळी मोठा विजय
वाराणसी मतदारसंघात मोदींना मागच्यावेळपेक्षा यावेळेस 1 लाख 7 हजार 721 मतं जास्त मिळाली आहेत. 2014 मध्ये मोदींना 3 लाख 71 हजार 784 मतं मिळाले होते. यावेळी 4 लाख 79 हजार 505 मतं मिळाले आहेत. गठबंधनच्या उमेदवार शालिनी यादव दुसऱ्या आणि काँग्रेसचे अजय राय तिसऱ्या स्थानी राहीले.