आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Narendra Modi Reply To Motion Of Thanks To President Address Today News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींनी १०० मिनिटे लोकसभेत, ७५ मिनिटे राज्यसभेत विरोधकांना घेरले; निदर्शनांबद्दल जबाबदार ठरवले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकमधील धार्मिक अल्पसंख्याकांचे रक्षण नेहरूंना हवे होते , ते काय जातीयवादी होते? मोदींचा सवाल
  • अर्थव्यवस्थेवर मोदींची हमी : अगदी निराश होण्याची गरज नाही
  • राहुल गांधींवर टीका }लाठ्या खाण्यासाठी सूर्यनमस्काराचा सराव वाढवेन

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) निदर्शनांना काँग्रेस आणि विरोधी पक्ष फूस लावत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत केला. संसद आणि विधानसभांत होणाऱ्या निर्णयांविरुद्ध रस्त्यांवर होत असलेली ही निदर्शने अराजकतेकडे नेणारी असतात. प्रत्येकाला चिंता वाटायला हवी, असा इशाराही माेदी यांनी दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या चर्चेच्या उत्तरांत मोदींनी सीएएचे जोदार समर्थन केले. ते म्हणाले, या कायद्यामुळे कोणत्याही भारतीयांच्या नागरिकत्वावर परिणाम होणार नाही. अल्पसंख्याकांना धोका नाही. काँग्रेसला उद्देशून मोदी म्हणाले, “देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना पाकमधील धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षा हवी होती म्हणून ते जातीयवादी होते? त्यांना हिंदू राष्ट्र घडवायचे होते?’ डावे पक्ष, काँग्रेस आणि मतांचे राजकारण करणाऱ्यांनी सीएएविरुद्ध काल्पनिक भय निर्माण करण्यासाठी पूर्ण शक्ती लावली आहे.’करंट पोहोचायला असा वेळ लागला,  ट्यूबलाइटबाबतच असे होते...


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या पाठीत लाठ्या घालण्यासंबंधी वक्तव्य केले होते. यावर मल्लिनाथी करताना मोदी म्हणाले, काँग्रेसच्या एका नेत्याने जाहीरनाम्याचे वाचन करताना नमूद केले की, देशातील युवक मोदींना लाठ्या घालतील. मी पण ठरवले आहे, यासाठी सूर्यनमस्काराचा सराव वाढवेन, जेणेकरून मला लाठ्या खाण्यासाठी शक्ती येईल. 
 
राहुल गांधी यांनी रोजगारावर बोला, अशी मागणी करताच मोदी म्हणाले, मी ३०-४० मिनिटे याच विषयावर बोलत होतो. मात्र, करंट तिथपर्यंत पोहोचायला इतका वेळ लागला. ट्यूबलाइटबद्दलच असे होत असते.नेहरू : कुणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून फाळणी केली
 
कुणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून देशाची फाळणी केली. शेजारी देशात यानंतर झालेल्या अत्याचाराची कल्पनाही करता येत नाही. नेहरू-लियाकत करारात धार्मिक अल्पसंख्याकांशी भेदभाव होणार नाही, असे स्पष्टपणे नमूद होते.

काँग्रेस : दिवसभरातील १०० वेळा ‘घटना बचाओ’चा मंत्र जपा
 
काँग्रेस चुकीच्या मार्गावर आहे. यामुळे काँग्रेस व देश अडचणीत येऊ शकतो. “घटना बचाओ’ मंत्राचा काँग्रेसने दिवसातून १०० वेळा जप करावा. आणीबाणी तसेच विरोधी पक्षांची राज्यातील सरकारे बरखास्त करताना त्यांना राज्यघटना आठवली नाही.शाहीन बाग : मत मांडणे अधिकार, खोटेपणाने काही मिळणार नाही

राजस्थानने समजा एखादा प्रस्ताव पारित केला आणि लोकांनी तो मान्य करण्यास नकार दिला तर काय होईल? मध्य प्रदेशात असे झाले तर काय होईल? देश असा चालत नसतो. खोटेपणा आणि अफवांतून काहीच मिळणार नाही. राज्यसघटनेचा सन्मान करा.पंतप्रधान पाकिस्तान-नेहरूंवर बोलतात, रोजगारावर मात्र मौन : राहुल


आज देशात रोजगार आणि अर्थव्यवस्था हा सर्वात मोठा मुद्दा आहे. पंतप्रधानांनी दीड तास भाषण केले. यात २ मिनिटे तरी युवकांबद्दल बोलून रोजगारासाठी काय केले हे सांगितले असते तर बरे झाले असते. यावर पंतप्रधान एक शब्द बोलले नाहीत. लोकांची ते दिशाभूल करत आहेत.