आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Budget 2019 : गरीबाला शक्ती, शेतकऱ्याला मजबुती आणि श्रमिकांना सन्मान देणारा अर्थसंकल्प-मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या शेटवच्या अर्थसंकल्पाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. हा अर्थसंकल्प गरीबाला शक्ती, शेतकऱ्याला मजबुती, श्रमिकांना सन्मान आणि मध्यमवर्गाला स्वप्ने पूर्ण करण्याची भरारी देणारा असल्याची पतिक्रिया मोदींनी दिली. लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशाला संबोधून केलेल्या भाषणात मोदींनी ही प्रतिक्रिया दिली. 


काय म्हणाले मोदी...
>> हे अंतरिम बजेट होते. हा तर फक्त ट्रेलर होता. निवडणुकांनंतर देश विकासाच्या मार्गावर वेगाने मार्गक्रमण करणार आहे. 
>> मध्यमवर्गापासून ते श्रमिक, शेतकरी, व्यावसायिक, उत्पादक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योजक तसेच अर्थव्यवस्थेचा विकास ते नव्या भारताच्या निर्माणाच्या दृष्टीने या बजेटमध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे. 
>> मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग यांनी प्रामाणिकपणे कर भरल्यामुले देशाचा विकासात गती घेता येता. गरीब तसेच देशातील पायभूत सोयी सुविधांची कामे केली जातात. त्यांची अनेक वर्षांची 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची मागणी होती. ती पूर्ण करण्यात आली आहे. 
>> शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत विविध सरकारतर्फे वेळोवेळी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. पण त्यामध्ये केवळ 2-3 कोटी शेतकऱ्यांचाच समावेश असायचा. पण आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत 5 एकरपेक्षा कमी शेती असलेल्या 12  कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 

Watch LIVE: PM @narendramodi's address post #InterimBudget2019 presentation.https://t.co/bPhJ0cNF3e

— PIB India (@PIB_India) February 1, 2019

 

बातम्या आणखी आहेत...