आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमिशन खोरांनो..दलाल चोरांनो..2022 मध्ये चौकीदाराच्या हस्तेच 30 हजार घरांचे उद्घाटन होणार- मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 'केवळ हेलिकॉप्टरच नव्हे तर लढाऊ विमानांच्या घोटाळ्यातही हात असलेल्यांचे मिशेल मामा कनेक्शन आता शोधावेच लागणार आहे. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळेच घाम फुटलेले आता चौकीदाराला चोर म्हणून हिणवत आहे,' या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राफेल आरोप'प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. कमिशन खोरांनो.. दलाल चोरांनो.. 2022 मध्ये चौकीदाराच्या हस्तेच 30 हजार घरांचे उद्घाटन होणार, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

 

भाजप सरकारकडून सर्वांना समान न्याय देण्याचे काम केले आहे. शहरांच्या स्वच्छतेप्रमाणेच मी सरकारमध्येही स्वच्छता केली आहे. 30 हजार घरांची योजना लवकरात लवकर पूर्ण करणार, विडी कामगार, रिक्षाचालकांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या दौऱ्यात सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल 30 हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, केंद्रीय वाहतूक व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के.विद्यासागरराव यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते,  मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

 

चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो- मोदी
ख्रिश्चन मिशेल याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर घोटाळ्यात सामील दलाला पकडून भारतात आणले आहे. जेलमध्ये बंद असलेल्या या दलालाने धक्कादायक खुलासा केला आहे. तो केवळ हेलिकॉप्टरच्या डीलमध्ये सहभागी नव्हता, तर आधीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत लढाऊ विमानांचा जो सौदा केला जात होता, त्यातही त्याची भूमिका होती. मिशेल मामाचा काँग्रेसशी काय संबंध आहे? चौकीदाराने जागे राहावे की झोपावे? तुमचा आशीर्वाद आहे, त्यामुळे चौकीदार लढत आहे. चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो, अशा शब्दांत मोदींनी विरोधाकांवर टीका केली.

 

मोदी म्हणाले, देशाची जनता चौकीदाराच्या पाठीशी उभी आहे म्हणून अनेक बड्या-बड्या लोकांचे आव्हान हा चौकीदार समर्थपणे पेलत आहे.

बातम्या आणखी आहेत...