आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून पुढील 9 दिवस फक्त एकच गोष्ट खातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या कोणत्या गोष्टींना हातदेखील लावणार नाहीत, 45 वर्षांपासून फॉलो करत आहेत या उपवासाचे नियम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या इंटरव्हूमध्ये अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीसोबत त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडादेखील केला आहे. त्यांनी चैत्र नवरात्रीदरम्यान त्यांचे भोजन काय असते, यासंबंधी माहिती दिली आहे. मोदी हे गर्मी आणि सर्दी अशा दोन्ही रूतूतील नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करतात. यावेळी चैत्र नवरात्री 6 एप्रिल म्हणजेच आजपासून सुरू होत आहे.


चैत्र नवरात्रीत खातील फक्त फळे
मोदींनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, ते अंदाजे 45 वर्षांपासून हा उपवास करतात, त्यांचा प्रयत्न असतो की, त्यांनी नेहमी हे वृत पाळावे. चैत्र एप्रिलमधील नवरात्रीत उपवास करणे त्यांच्यासाठी तितके अवघड काम नसेत, जितके सप्टेंबरच्या नवरात्रीत असते. 


त्यांनी सांगितले की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या नवरात्रीत त्यांचा काही वेळ ध्यान साधनेत जातो. ते पुर्ण 9 दिवर फक्त पाणी पितात , बाकी काहीच खात नाहीत. तर चैत्र नवरात्री दरम्यान ते कोणतेही एक फळ निवडतात, जसे यावेळी त्यांनी पपई ठरवली आहे. त्या एका फळाशिवाय ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला हात लावत नाहीत. 


पपई खाण्याचे फायदे

1. कोलेस्ट्रॉल कमी होते
2. वजन नियंत्रीत राहते
3. इम्यूनिटी वाढवते
4. डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते
5. डायझेशन सिस्टीम चांगली करते
 

बातम्या आणखी आहेत...