आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Tweets Thinking Of Giving Up All Social Media Account, Rahul Gandhi Gives Suggestion

रात्री ८:५६ वाजता माेदींचे ट्विट : ‘रविवारपर्यंत साेशल मीडिया सोडण्याचा विचार करतोय’; रात्री १२ ला #No Sir टॉप ट्रेंडिंगवर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साेशल मीडिया नव्हे, द्वेष करणे सोडा, राहुल गांधींचा पीएम मोदींना टोला
  • टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब सोडण्याची व्यक्त केली इच्छा;कारणांवरून तर्क-वितर्क

नवी दिल्ली -साेशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेले पंतप्रधान नरेंद्र माेदींनी साेमवारी रात्री आश्चर्याचा धक्का देत आपण साेशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. रात्री ८:५६ वाजेच्या ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम व यूट्यूब साेशल मीडिया अकाउंट्स सोडण्याचा विचार करतोय. माहिती देत राहीन.’ यानंतर तर्क-वितर्कांना ऊत आला. पाठीराख्यांनी त्यांना असे न करण्याचा आग्रह केला. रात्री १२ वाजेपर्यंत ‘#No Sir’ टाॅप ट्रेंडवर गेले. बहुतांश युजर्सच्या मते, साेशल मीडियावरील विखाराने उद्विग्न होऊन मोदींनी ही इच्छा व्यक्त केली आहे.साेशल मीडियावरून माेहिमा

> निवडणुकीत ‘चाैकीदार चाेर है’ विरुद्ध ‘मैं भी चाैकीदार’ ही मोहीम राबवली. यातून बाजीही पलटवली.
> भाजपमध्ये उमेदवारीसाठी सोशल फाॅलाेअर्सचा आकडाही निकष होता. 
> ‘मन की बात’मध्ये सेल्फी विथ डाॅटर मोहिमचे आवाहन केले. ते साेशल मीडिया खूप लोकप्रिय झाले.ट्विटरवर माेदींचे ५.३३ कोटी फाॅलाेअर्स


> फेसबुक:    4.4     कोटी फाॅलाेअर्स 
> इन्स्टाग्राम:    3.5     कोटी फाॅलाेअर्स
> यूट्यूब:    45     लाख फाॅलाेअर्सकेंद्र सुप्रीम कोर्टात म्हणाले होते : सोशल मीडियावर विखारीपणा वाढला, हा देशाच्या अखंडत्वाला धोका


ऑक्टोबर २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टात सरकार म्हणाले, ‘सोशल मीडियावर िवखारीपणा, फेक न्यूज व अवमानकारक पोस्ट वाढल्या आहेत. देशाचे अखंडत्व, सुरक्षेसाठी हे धोकादायक आहे. न्या. दीपक गुप्ता म्हणाले होते, ‘राज्य स्वत:चे ट्रोलिंग रोखू शकते, मात्र एखाद्याविरुद्ध खोटारडेपणा पसरवला तर त्याने काय करावे?सर्वाधिक अटकळी या तीन बाबींविषयी


> दिल्ली दंगली: मोदींनी हिंसाचार न करण्याचे आवाहन केले होते.
> भारतीय प्लॅटफॉर्म : भारत आपला सोशल मीडिया उभारू शकतो.
> तयारी : सोशल मीडिया कंपन्यांवर लगामाची ही  घोषणाही असू शकते.राहुल गांधी म्हणाले: साेशल मीडिया नव्हे, द्वेष करणे सोडा


राहुल गांधींनी मोदी यांच्या ट्विटचे स्क्रीन शाॅट शेअर करत, ‘साेशल मीडिया नव्हे, द्वेष करणे सोडा,’असा टोला मारला. अमृता फडणवीसांचे रिट्विट; नेत्याच्या पावलावर पाऊल
 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही मोदींचे ट्विट रिट्विट केले. त्या म्हणाल्या, कधी कधी एक छोटा निर्णयही आपले आयुष्य बदलू शकतो. आपणही अापल्या नेत्याच्या पावलावर पाऊल टाकणार आहोत.बातम्या आणखी आहेत...