आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pm Narendra Modi Visiting South India, Plan Andhra Guntur Tamil Nadu Then Karnatka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण भारतातील तीन राज्यांत मोदींच्या सभा, आंध्रच्या मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या दौऱ्याविरुद्ध निदर्शने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दक्षिण भारतातील तीन राज्य आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी विकासकामांचे उद्घाटन करण्यासह कोनशिला ठेवणे आणि गुंटूरसह इतर ठिकाणी सभांना संबोधित करणे हा त्यांच्या दौऱ्याचा भाग आहे. गेल्या वर्षीच तेलुगू देसम पक्षाने भाजपसोबतची युती तोडली. त्यानंतर मोदींनी आंध्र प्रदेश दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशात आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा निषेध केला. सोबतच, अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे.

 

आंध्र प्रदेशसोबत विश्वासघाताचा निषेध -नायडू
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख तसेच मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शनिवारीच आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शनांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. ''मोदी सरकारकडून आंध्र प्रदेशसोबत विश्वासघात करण्यात आला आहे. त्याच विश्वासघाताविरुद्ध निदर्शने करा. यांची अख्ख्या देशात चर्चा व्हायला हवी. राज्य सरकारला अस्थिर करण्याचा कट रचण्यात आला. पंतप्रधान 2014 मध्ये झालेल्या विभाजनानंतर उद्ध्वस्त झालेला राज्य पाहण्यासाठी येत आहेत.'' येथील लोक जीवित आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी पीएम दौरा करत आहेत असेही नायडू म्हणाले.

 

तामिळनाडू-कर्नाटकात विविध योजनांची सुरुवात
गुंटूरनंतर पीएम मोदी तामिळनाडूच्या तिरुपूरमध्ये 100 बेड असलेल्या ईएसआयसी रुग्णालय, त्रिचि एअरपोर्टवर नवीन भवन आणि चेन्नई विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांचा पाया रोवणार आहेत. चेन्नईमध्ये भारत पेट्रोलियमच्या तटवर्ती टर्मिनल आणि चेन्नई मेट्रोच्या एका फेझची सुरुवात करणार आहेत. मोदी कर्नाटकच्या धारवाड येथे IIT ची कोनशिला ठेवणार आहेत. यानंतर मेंगलुरू आणि पेद्दुर येथे पेट्रोलियम रिझर्व्ह राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...