आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अरुण जेटलींच्या कुटुंबीयांची निवासस्थानी घेतली भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिवंगत अरुण जेटली यांच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी अमित शाह सोबत होते. 24 ऑगस्ट रोजी जेटलींचे निधन झाले तेव्हा मोदी परदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जेटलींच्या पत्नी संगीता यांचे फोनवरून सांत्वन केले होते. 

अरुण जेटलींच्या निधनावेळी पंतप्रधान परदेश दौऱ्यावर होते. यामुळे त्यांना जेटलींच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावता आली नाही. दरम्यान मोदींनी परदेश दौरा अर्ध्यावर सोडून येऊ नये संगीता यांनी सांगितले होते. परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदींनी मंगळवारी जेटली कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी मोदींना गहिवरून आले. 

बातम्या आणखी आहेत...